सेवानिवृत्त जमादाराच्या घरावर नोकराचा डल्ला

Advertisements
Advertisements
Spread the love

औरंगाबाद सुदर्शनगरमध्ये बाहेरगावी गेलेल्या सेवानिवृत्त जमादाराचे घर फोडून नोकरानेच एक तोळ्याचे सोन्याचे दागिने आणि पंधरा हजाराची रोकड लांबवली. हा प्रकार शुक्रवारी सकाळी उघडकीस आला. या घटनेची माहिती मिळताच औरंगाबाद सिडकोसह गुन्हे शाखा पोलिसांनी धाव घेतली. दरम्यान, या नोकराचा सायंकाळपर्यंत शोध सुरू होता.

Advertisements

जळगाव येथून सेवानिवृत्त झालेले जमादार दगडू पांडू चौंढे (५८, रा. सुदर्शननगर, हडको) हे बुधवारी नातेवाईकांच्या लग्न समारंभासाठी कुटुंबियांसह बाहेरगावी गेले होते. लग्नावरून शुक्रवारी परत आल्यावर त्यांना घराचा कडी कोंडा तुटलेला दिसला. त्यामुळे आत जाऊन पाहणी केली असता कपाटातील सोन्याची एक तोळ्याची पोत आणि रोख पंधरा हजार चोरीला गेल्याचे निदर्शनास आले. या घटनेची माहिती तात्काळ सिडको पोलिसांना देण्यात आली. त्यानंतर सिडको पोलिसांसह श्वान पथक आणि गुन्हे शाखा पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली. याप्रकरणी चौंढे यांच्या तक्रारीवरुन सिडको पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Advertisements
Advertisements

आपलं सरकार

Click to listen highlighted text!