UttraPradeshCrimeUpdate : सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणातील पुजाऱ्यासह सर्व आरोपी गजाआड

उत्तर प्रदेशच्या बदायू जिल्ह्यात झालेल्या सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी असलेल्या मंदिरातील पुजाऱ्यासहीत तीनही आरोपींना पोलिसांनी अटक केली असल्याचे वृत्त आहे. विशेष म्हणजे मुख्य आरोपी असलेल्या सत्यनारायण याच्या अटकेसाठी ५० हजाराचे बक्षीस घोषित करण्यात आलं होतं. घटना समोर आली त्यादिवशी सत्यनारायण गावातच लपून बसल्याचंही समोर आली आहे. इतर दोन आरोपी जसपाल आणि वेदराम यांना पोलिसांनी अगोदरच अटक केली होती.
Uttar Pradesh Police have arrested the main accused in Budaun gangrape and murder case. He had a bounty of Rs 50,000 on his head.
— ANI UP/Uttarakhand (@ANINewsUP) January 8, 2021
बदायू जिल्ह्यात ३ जानेवारी रोजी एका ५० वर्षीय आंगणवाडी सेविका असेलल्या महिलेवर सामूहिक बलात्कार आणि तिची क्रूर हत्या केल्यानंतर महंत सत्यनारायण फरार होता. सत्यनारायणचा शोध घेण्यासाठी पोलिसांच्या चार टीम तैनात करण्यात आल्या होत्या. धक्कादायक म्हणजे, गावातच लपून बसलेल्या सत्यनारायणला शोधण्यात पोलिसांना अपयश येत होतं. मात्र, गुरुवारी रात्री उशिरा आरोपी सत्यनारायण याला अटक करण्यात आली असल्याचे पोलिसांनी सांगितले.
या सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणाची चौकशी सुरू झाल्यानंतर ५० हजार रुपयांचं बक्षीस असलेला सत्यनारायण शेजारच्याच गावात लपून बसला होता. पोलिसांच्या चार टीम बदायूसहीत इतर जिल्ह्यांत सत्यनारायणचा शोध घेत छापे टाकत होती. या दरम्यान त्यानं उघैती स्टेशन परिसरातील एका गावात आसरा घेतला होता. परंतु, ग्रामस्थांनीच सत्यनारायणला पकडून पोलिसांच्या हवाली केल्याचं वृत्त आहे. सत्यनारायणच्या अटकेचा एक व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झालाय. यामध्ये पोलिसांचे दोन कॉन्स्टेबल महंत सत्यनारायण याला बाईकवर बसवून घेऊन जाताना दिसत आहेत. दरम्यान सत्यनारायणला कोण पाठीशी घालत होते. याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. परंतु, सोबतच पोलिसांच्या तपासावरही अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. कारण सत्यनारायणला शोधण्यासाठी पोलिसांना तब्बल चार दिवस लागलेत.