NagpurNewsUpdate : दोन बहिणींचा उपासमारीने मृत्यू

राज्याच्या उपराजधानीत नागपुरात दोन बहिणींचा उपासमारीने एकाच वेळी दोन मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे. दोन बहिणींचे हे मृतदेह कुजलेल्या अवस्थेत सापडला आहे. या घटनेनंतर नागपुरात चिंता व्यक्त केली जात आहे. नागपुरातील कामठी इथे ही धक्कादायक घटना समोर आली आहे. पद्मा लवटे वय वर्ष 60 आणि कल्पना लवटे वय वर्ष 50 अशी या दोन बहिणींची नावे आहेत. या दोघीही मनोरुग्ण होत्या अशी देखील प्राथमिक माहिती समोर आली आहे. दोन बहिणींचा अचानक मृत्यू झाल्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. दरम्यान या प्रकरणाची माहिती पोलिसांना मिळताच ते घटनास्थळी दाखल झाले. दरम्यान या प्रकरणी पोलिसांनी दोन्ही मृतदेह शव विच्छेदनासाठी पाठवले असून भूकबळीतून दोन बहिणींचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती देण्यात आली आहे. तर या प्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.