WorldNewsUpdate : धक्कादायक : अमेरिकेत कोरोनाचा कहर चालूच , गेल्या २४ तासात लाखाहून अधिक रुग्णांचा मृत्यू

अमेरिकेत कोरोनाचा कहर चालूच असून गेल्या २४ तासांमध्ये एक लाखांहून अधिक करोनाबाधित आढळले आहेत. जगभरात करोनाचा सर्वाधिक संसर्ग अमेरिकेत झाला असून दोन कोटींहून अधिकजणांना बाधा झाली आहे. तर, तीन लाख ५३ हजारजणांचा मृत्यू झाला आहे.
या संदर्भात अमेरिकेतील जॉन हॉपकिन्स विद्यापीठाच्यावतीने जारी करण्यात आलेल्या आकेडवारीनुसार, अमेरिकेत या महासाथीच्या आजाराने गंभीररुप धारण केले आहे. मागील २४ तासांमध्ये एक लाख ६२ हजार ४२३ नवीन करोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे बाधितांची संख्या दोन कोटी सात लाखांहून अधिक झाली आहे. तर, मागील २४ तासांमध्ये १६८१ बाधितांच्या मृतांची नोंद करण्यात आली आहे.
अमोरिकेतील न्यूयॉर्क, टेक्सास आणि कॅलिफोर्निया राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर करोनाचा संसर्ग झाला आहे. न्यूयॉर्कमध्ये करोना संक्रमणामुळे ३८ हजार ५९९ जणांचा मृत्यू झाला आहे. तर, टेक्सासमध्ये २८ हजार ५५१ जणांचा मृत्यू झाला आहे. कॅलिफोर्नियात करोनामुळे २६ हजार ६६५ जणांना प्राण गमवावे लागले आहे. तर, फ्लोरिडामध्ये २२ हजारजणांचा मृत्यू झाला आहे. त्याशिवाय, न्यूजर्सीमध्ये १९ हजार २२५, मिशिगनमध्ये १३ हजार ३९१, पेन्सिल्वेनियामध्ये १६ हजार ३३५ जणांना प्राण गमवावे लागले आहे. अमेरिकेतील कॅलिफोर्निया, कोलोराडो आणि फ्लोरिडा राज्यांमध्ये करोनाच्या नव्या स्ट्रेनचे रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे प्रशासन अधिक सतर्क झाले आहेत. अमेरिकेत सध्या फायजर आणि मॉडर्नाच्या लशीला मंजुरी देण्यात आली आहे. अमेरिकेत लसीकरण सुरू असून या दरम्यान, काहींना लशीचे साइड इफेक्टसही जाणवले.
दरम्यान, जागतिक आरोग्य संघटनेने फायजर-बायोएनटेकने विकसित केलेल्या लशीला मंजुरी दिली आहे. करोनाला अटकाव करण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेकडून पहिल्यांदाच एखाद्या लशीला मान्यता देण्यात आली. जागतिक आरोग्य संघटनेच्या या मंजुरीनंतर आता लशीच्या वापरासाठी जागतिक पातळीवर मार्ग खुला झाला आहे. याआधीच काही देशांनी फायजर-बायोएनटेकच्या लशीला मंजुरी दिली आहे. फायजरच्या लशीला जागतिक आरोग्य संघटनेने मंजुरी दिल्यामुळे ही लस गरीब देशांनाही उपलब्ध होण्याची शक्यता आहे. आतापर्यंत ही लस अमेरिका आणि युरोपमध्येच उपलब्ध आहे.