IndiaCrimeUpdate : भयानक : केलेल्या कामाची मजुरी मागणे बेतले मजुराच्या जीवावर , मुकादमाने गुप्तांगात एअर कॉम्प्रेन्सरने भरली हवा !!

क्रशरवर काम करणाऱ्या मजुराने मजुरी मागितल्याच्या रागातून मुकादमाने मजुराच्या गुप्तांगात एअर कॉम्प्रेन्सरनं हवा भरल्याची भयानक घटना घडली असल्याचे वृत्त आहे. या घटनेत जखमी झालेल्या मजुरावर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू होते आणि या उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला आहे. ही घटना मध्य प्रदेशातील शिवपुरीपासून 70 कि.मी. अंतरावर असलेल्या गोवर्धन परिसरात घडली आहे. या मजुराच्या मृत्यूमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. न्यूज १८ लोकमतने याबाबतचे वृत्त दिले.
Madhya Pradesh: A man died after his employer allegedly pumped air into his rectum with a compressor following a dispute in Gobardhan, Shivpuri.
"The incident took place 45 days ago. I have instructed the concerned officer to take necessary action," says SP. (26.12) pic.twitter.com/mHpIg8rCkv
— ANI (@ANI) December 26, 2020
या प्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गाझीगड धारिया येथे राहणारा परमानंद हा धाकड गावाजवळ तोमर बिल्डर्सच्या गिट्टी क्रशरवर काम करीत होता. याविषयी मृताचा भाऊ धनीराम यांनी पोलिसांना सांगितले की, भावाचा कामावरील मुकादम राजेश राय याच्याशी ८ नोव्हेंबर रोजी सकाळी ९ वाजता वाद झाला होता. रागाच्या भरात इंचार्जने मजुराच्या गुप्तांगात एअर कॉम्प्रेसरने हवा भरली. शरीरात हवा भरली गेल्यामुळे त्याच्या शरीरातील धमन्या फाटून गेल्या . गंभीर जखमी अवस्थेत त्याला तातडीनं रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं. मात्र उपचारा दरम्यान या मजुराचा मृत्यू झाला.