IndiaNewsUpdate : काही लोक मला लोकशाही शिकवण्याचा प्रयत्न करत आहेत , नरेंद्र मोदी यांचा राहुल गांधींवर पलटवार

गुरुवारी राष्ट्रपतींना शेतकऱ्यांच्या आंदोलनाबाबत भेटून निवेदन दिल्यानंतर माध्यमांशी बोलताना राहुल गांधी “मोदी अकार्यक्षम असून त्यांना प्रशासन कसे चालवले जाते याची यित्कचितही माहिती नाही. त्यांच्या नजीकच्या तीन-चार भांडवलदारांच्या आधारे ते देश चालवत आहेत. त्यांच्याविरोधात अवाक्षरही काढलेले चालत नाही, जर सरसंघचालक मोहन भागवत हे मोदी यांच्याविरोधात बोलले तर त्यांनादेखील दहशतवादी ठरवले जाईल,” असा गंभीर आरोपही केला होता त्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचे नाव न घेता उत्तर दिले आहे.
Even after Supreme Court has directed that Panchayati and municipal elections should be conducted in Puducherry, the elections are not being conducted there. Those who keep on teaching me lessons on democracy are the ones who are running their govt there: PM Modi pic.twitter.com/Y4HxxuCcUy
— ANI (@ANI) December 26, 2020
आपल्या उत्तरात मोदी यांनी म्हटले आहे कि , दिल्लीमधील काही लोक मला लोकशाही शिकवण्याचा प्रयत्न करत आहेत. केंद्रशासिच प्रदेशातील नागरिकांसाठी आरोग्य विमा संरक्षण देण्यासाठी आयुषमान भारत योजनेची सुरुवात केल्यानंतर ते बोलत होते. “दिल्लीतील काही लोक मला नेहमी टोमणे मारत अपमान करत असतात. त्यांना मला लोकशाहीचे धडे द्यायचे आहेत. त्यांना मला सांगायचं आहे की जम्मू काश्मीरमधील जिल्हा विकास परिषदेच्या निवडणुका लोकशाहीचं उदाहरण आहे,” असं नरेंद्र मोदींनी म्हटलं आहे.
“काही राजकीय लोक सारखं लोकशाहीवर लेक्चर देत असतात. पण त्यांचा दुटप्पीपणा आणि खोटारडेपणा तर पहा की सुप्रीम कोर्टाने दिलेल्या आदेशानंतरही पाँडिचेरीमध्ये स्थानिक निवडणूक झालेली नाही. तर दुसरीकडे जम्मू काश्मीर केंद्रशासित प्रदेश झाल्यानंतर एका वर्षाच्या आतच पंचायत स्तरीय निवडणुका झाल्या आहेत,” असंही नरेंद्र मोदींनी म्हटलं आहे. नरेंद्र मोदींनी यावेळी जम्मू काश्मीरमधील स्थानिक निवडणुकांमुळे लोकशाहीचा पाया घट्ट झाल्याचं सांगत मतदारांचं अभिनंदन केलं.