IndiaNewsUpdate : तुम्ही आयकर भरला ? असा आहे अखेरचा दिनांक

ITR भरण्याची तारीख कोरोनामुळे 31 जुलैवरून 31 ऑक्टोबर 2020 करण्यात आल्यानंतर 24 डिसेंबर 2020 पर्यंत 3.97 कोटी करदात्यांनी असेसमेंट इयर 2020-21 साठी आयटीआर (Income Tax Return) दाखल केला आहे. आयकर विभागाने यासंदर्भात ट्वीट करून माहिती दिली आहे. शिवाय आयकर विभागाने या ट्वीटच्या माध्यमातून उर्वरित करदात्यांना लवकरात लवकर आयटी रिटर्न भरण्याचे आवाहन देखील केले आहे. ITR दाखल करण्याची शेवटची तारीख 31 डिसेंबर 2020 आहे. कोरोना पँडेमिकमुळे करदात्यांसाठी 31 डिसेंबरपर्यंत ही तारीख वाढवण्यात आली होती. गेल्यावर्षी आयटी रिटर्न फाइल करण्याची शेवटची तारीख 31 ऑगस्ट 2019 होती.
Over 3.97 crore Income Tax Returns have already been filed till 24th of December, 2020.
Have you filed yours as yet?
If not, please do it TODAY!
File your Return of Income Tax & ….Relax!
Pl visit https://t.co/EGL31K6szN.#ITR#AajHiFileKaro pic.twitter.com/sqiUQYWOPi— Income Tax India (@IncomeTaxIndia) December 25, 2020
आयकर विभागाच्या मते 2.27 कोटी करदात्यांनी ITR-1 फॉर्म, 85.20 लाख करदात्यांनी ITR-4 फॉर्म, 46.78 लाख करदात्यांनी ITR-3 फॉर्म आणि 28.74 लाख ITR-2 फॉर्म भरला आहे. व्यक्तिगत करदात्यांसाठी AY 2020-21 साठी 31 डिसेंबर 2020 ही शेवटची तारीख आहे. मात्र ज्या लोकांच्या खात्यासाठी ऑडिट आवश्यक आहे, त्यांच्यासाठी रिटर्न दाखल करण्याची तारीख 31 जानेवारी 2021 आहे. तुम्हाला ऑफलाइन किंवा ऑनलाइन पद्धतीने आयटीआर फाइल करता येईल.