MaharashtraNewsUpdate : मनुस्मृती दहन दिवस : गृहमंत्री अनिल देशमुख , छगन भुजबळ , खा. फौजिया खान यांनी केले मनुस्मृती दहन

माणसाचे माणूसपण नाकारून समाजाला चार वर्णात विभाजित करून विषम व्यवस्था निर्माण करणाऱ्या मनुस्मृतीच्या विरोधात बंद करीत २५ डिसेंबर १९२७ ला भारतरत्न डॉ . बाबासाहेब आंबेडकरांनी महाड येथे मनुस्मृतीचे दहन केले होते . या दिवसाचे स्मरण करीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने मनुस्मृतीचा धिक्कार करून दहन करण्यात आले. या कार्यक्रमात राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख , छगन भुजबळ , खा. फौजिया खान यांचा प्रामुख्याने सहभाग होता. यावेळी शेतकरी आंदोलनाला पाठिंबा जाहीर करण्यात आला .
याबद्दल ट्विट करताना अनिल देशमुख यांनी म्हटले आहे कि , ” वर्षानुवर्षे चातुर्वर्ण व्यवस्थेत दबल्या गेलेल्या तमाम वंचित, शोषित आणि स्त्रियांना न्याय, हक्क, सन्मान आणि स्वातंत्र्य नाकारून विकासाच्या प्रवाहापासून दूर ठेवणाऱ्या मनुस्मृतीचे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी आजच्या दिवशी दहन केले होते.”
वर्षानुवर्षे चातुर्वर्ण व्यवस्थेत दबल्या गेलेल्या तमाम वंचित, शोषित आणि स्त्रियांना न्याय, हक्क, सन्मान आणि स्वातंत्र्य नाकारून विकासाच्या प्रवाहापासून दूर ठेवणाऱ्या मनुस्मृतीचे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी आजच्या दिवशी दहन केले होते.#मनुस्मृती_दहन_दिवस pic.twitter.com/YmmnmZ5rHU
— ANIL DESHMUKH (@AnilDeshmukhNCP) December 25, 2020