AurangabadNewsUpdate : इंग्लंडहून आलेल्या ४४ प्रवाशांपैकी ११ जणांची चाचणी , १ महिला पॉझिटिव्ह

औरंगाबाद : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यामध्ये इंग्लंडहून आलेल्या प्रवाशांवर जिल्हा प्रशासन विशेष लक्ष ठेवून आहे. 25 नोव्हेंबरपासून शहरामध्ये 44 नागरिक इंग्लंडहून प्रवास करून आलेले आहेत. या सर्वांची यादी शासनाने जिल्हा प्रशासनाकडे पाठवलेली आहे. या सर्व प्रवाशांचा पालिका प्रशासन शोध घेत असून त्यांच्या RTPCR चाचण्या करत आहे. याबाबत शासनाने दिलेल्या निर्देशानुसार आज झालेल्या District Task Force च्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला.
Test done -11
(9– negative,1 – positive,1- waiting)
Today going for test-4
Return back to foreign-6
Contacted-2
Not traceable -13
Quarantine at Mumbai-1
Abd dist-2
Out of dist-5
Total -44
25 नोव्हेंबरपासून आलेल्या 44 प्रवाशांपैकी 11 जणांची RTPCR चाचणी करण्यात आली असून यामध्ये एक महिला पॉझिटीव्ह आढळली आहे. ह्या महिलेमध्ये कोणतेही लक्षण आढळून आलेली नाहीत. सध्या तिची तब्यत स्थिर असून तिच्यावर सेठ नंदलाल धुत हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. ह्या महिलेला पूर्वीपासून कोविडची लागण झालेली होती का शहरात आल्यावर लागण झाली याबाबत तसेच तिच्यात आढळलेला विषाणू हा नेहमीचा आहे की नवीन स्ट्रेंथमधील आहे याबाबत संशोधन करण्यासाठी सदर महिलेचा स्वँब पुण्यातील राष्ट्रीय विषाणू संस्थेकडे (National Institute Of Virology) पाठविला असल्याचे मनपाच्या आरोग्य अधिकारी डॉ. नीता पाडळकर यांनी सांगितले आहे.
इंग्लंडहून आलेल्या प्रवाशांमधील पॉझिटिव्ह निघणाऱ्या प्रवाशांना सध्याच्या कोविड सेंटर अथवा DCC मध्ये न ठेवता त्यांची सेठ नंदलाल धुत हॉस्पिटल मध्ये विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच निगेटिव्ह येणाऱ्या प्रवाशांना आणि संशयतींना विलगीकरणासाठी शहरातील The ONE या हॉटेलमध्ये ठेवण्यात येणार आहे.
जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन
जे प्रवासी मागच्या काही दिवसांपूर्वी इंग्लंडहून प्रवास करून आलेले आहेत त्यांनी स्वतःहून जिल्हा प्रशासन तसेच महापालिका प्रशासनाने कळवावे आणि त्यांनी स्वतःची RTPCR टेस्ट करून घ्यावे असे आवाहन जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी केले आहे.