NagpurNewsUpdate : कारला ट्रेलरने उडविले , भीषण अपघातात ४ जण जागीच ठार

नागपुरातील मिहान परिसरात सोनेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मिहान पुलाजवळ एका कारला ट्रेलरने उडविल्याने झालेल्या भीषण अपघातात यात एकाच कंपनीतील चौघे जण ठार झाले. तर एकावर उपचार सुरू आहेत. बालचंद उइके, पीयूष टेकाडे, नेहा गजभिये आणि पायल कोचे अशी मृतांची नावे आहेत. तर आशिष सरनायल यांच्यावर सरकारी वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हे सर्व कर्मचारी एग्जावेअर कंपनीतून काम संपवून कारने घरी परतत होते. त्याचवेळी शुक्रवारी पहाटे दोन वाजताच्या सुमारास खापरी पुलावर त्यांच्या कारला ट्रेलरने उडवले. ही धडक इतकी भीषण होती की, कारचा चक्काचूर झाला. मृत आणि जखमी कर्मचारी हे एकाच कंपनीतील कर्मचारी होते. सोनेगाव पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद करण्यात आली असून, तपास सुरू आहे.