MaharashtraNewsUpdate : पोलीस प्रशिक्षण केंद्रात १७० जणांना कोरोनाची बाधा

नाशिकच्या पोलीस प्रशिक्षण केंद्रातील १७० जणांना कोरोनाची लागण झाली असल्याचे वृत्त आहे. या घटनेमुळे महापालिका नाशिक जिल्हा तसेच महानगरपालिका प्रशासनही हादरलं आहे. नाशिक शहरातील पोलीस प्रशिक्षण केंद्रात तब्बल १७० जणांचे कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. यात पोलीस प्रशिक्षणार्थी आणि पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. कोरोनाबाधित प्रशिक्षणार्थी आणि कर्मचाऱ्यांना नाशिकच्या ठक्कर डोम कोविड सेंटर आणि खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.