IndiaNewsUpdate : शेतकरी आंदोलन : धक्कादायक : आंदोलन समर्थक संत बाबा राम सिंह यांची स्वतःवर गोळ्या झाडून आत्महत्या

मोदी सरकारने केलेल्या नवीन कृषि कायद्याविरोधात सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाबाबत मोठी बातमी समोर आली आहे. दिल्ली-हरियाणा बॉर्डर (सिंघू बार्डर) वर शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी आवाज उठविण्यासाठी आलेले संत बाबा राम सिंह यांनी बुधवारी आत्महत्या केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. गोळी लागल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार बाबा राम सिंह यांना जखमी अवस्थेत एका खासगी रुग्णालात भरती करण्यात आलं होतं. येथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. आतापर्यंत २० आंदोलकांचा मृत्यू झाला आहे.
#FarmerProtest
सिंघु बॉर्डर पर किसान आंदोलन में आए संत बाबा राम सिंह, नानकसर सिंगरा ने एक सुसाइड नोट लिखकर अपने आप को गोली मार ली , अस्पताल में हुई मौत@NBTDilli @gulshanNBT @AshishXL pic.twitter.com/KHZwLpOEWc— Rajesh poddar (@Rajeshpoddar00) December 16, 2020
गेल्या अनेक दिवसांपासून दिल्ली हरयाणा (सिघू) सीमेवर शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे. कृषी कायदे मागे घेण्यासाठी गेल्या २० दिवसांपासून शेतकरी आंदोलन करत आहेत. या आंदोलनादरम्यान यात सहभागी असलेले संत बाबा राम सिंह यांनी बुधवारी स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार घडला. बाबा राम सिंह हे करनालमधील रहिवासी होती. त्यांच्या मृत्यूनंतर एक सुसाईड नोटदेखील समोर आली आहे. सांगितले जात आहे की संत बाबा रामसिंग हरियाणामधील करनाल येथे राहणारे होते. एका गुरुद्वाऱ्याचे ते प्रमुख आहेत . ट्विटर वापरकर्त्यांनी बाबांनी लिहिलेली सुसाइड नोटही पोस्ट केली आहे. असा दावा केला जात आहे की या सुसाईड नोटमध्ये त्यांनी शेतकऱ्यांच्या चळवळीचा आणि शेतकर्यां च्या हक्कांसाठी आवाज उठवण्याविषयी उल्लेख केला आहे.
दरम्यान नवीन कृषी कायद्यांविरोधात सुरू असणाऱ्या आंदोलनादरम्यान सरकारने देशातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय घेतला आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीत असा निर्णय घेण्यात आला की ऊस उत्पादक शेतख्यांना ३५०० कोटींची निर्यात सबसिडी , १८ हजार कोटींच्या निर्यात लाभासह दुसरी सबसिडी देखील देण्यात येईल. केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी अशी माहिती दिली आहे की, यावर्षी सरकारने ६० लाख टन साखर निर्यात करण्याचा निर्णय घेतला आहे. यावरील सबसिडी थेट ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ट्रान्सफर DBT केली जाईल