MaharashtraNewsUpdate : कार आणि दुचाकीची समोरा समोर धडक , एक ठार दोन जखमी

नागपूर-औरंगाबाद महामार्गावरील वाशिम जिल्ह्यातील नागरतास येथे कार आणि दुचाकीची समोरा समोर धडक होऊन भीषण अपघात झाला आहे. या अपघातात एक जण जागीच ठार झाला आहे, तर दोन जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली. अपघातामधील गंभीर जखमींना वाशिम येथील रुग्णालयात पाठविण्यात आले असून सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. मृतक गणेश कहळे हा माळराजुरा येथील असून अवरदरी येथील रघुनाथ आंधळे आणि अमोल कांबळे हे गंभीर जखमी झाले आहेत. नागपूर-औरंगाबाद महामार्गावर झालेल्या या अपघातात अपघातग्रस्त दोन्ही वाहनांचं मोठं नुकसान झालं आहे. दोन्ही वाहने वेगात असल्याने हा अपघात झाल्याचं सांगितलं जात आहे. याप्रकरणी पुढील तपास मालेगाव पोलीस करत आहेत.