IndiaNewsUpdate : शूद्रांना शूद्र म्हटल्याने राग येतो कारण ते नासमझ आहेत , भाजप खासदार साध्वी प्रज्ञा कडून चातुर्वण्य व्यवस्थेचे समर्थन

#WATCH | Kshatriya ko kshatriya keh do, bura nahi lagta. Brahmin ko brahmin keh do, bura nahi laga. Vaishya ko vaishya keh do, bura nahi lagta. Shudra ko shudra keh do, bura lag jata hai. Kaaran kya hai? Kyunki samajh nahi paate: BJP MP Pragya Singh Thakur in Sehore, MP (12.12) pic.twitter.com/CbCctxmACp
— ANI (@ANI) December 12, 2020
भाजपच्या खासदार साध्वी प्रज्ञा यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. ब्राह्मणी धर्मातील चातुर्वण्य व्यवस्थेचे समर्थन करताना एका सभेत त्या म्हणाल्या कि , आमच्या धर्मशात्राने सामाजिक व्यवस्थेसाठी चार वर्ण निश्चित केले आहेत . क्षत्रियांना क्षत्रिय बोललं, तर त्यांना राग येत नाही. ब्राह्मणाला ब्राह्मण म्हटलं तर, त्यांना वाईट वाटत नाही. वैश्याला वैश्य म्हटलं, तर त्यांनाही वाईट वाटत नाही. पण शुद्राला शूद्र म्हटलं तर त्यांना राग येतो, याचं कारण काय आहे? कारण त्यांना समजत नाही.” त्यांच्या या वादग्रस्त वक्तव्याचा व्हिडिओही समोर आला आहे.
वादग्रस्त वक्तव्यांसाठी नेहमीच चर्चेत असणाऱ्या साध्वी प्रज्ञा यांनी शनिवारी मध्य प्रदेश मधील सीहोर येथील एका कार्यक्रमात त्यांनी जातीव्यवस्थेबाबत एक वादग्रस्त विधान केलं आहे. तसंच पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याबाबत अपशब्द वापरून त्यांनाही लक्ष्य केलं. भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या ताफ्यावर झालेल्या हल्लासंबंधीही तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करत ममता बॅनर्जी यांच्यावर निशाणा साधला. त्या म्हणाल्या की, “बंगालमधील ममताचे शासन आता संपुष्टात येत आहे, हे त्यांना समजलं आहे. म्हणूनच त्यांनी एवढा आगपाखड केली आहे.” या विधानसभा निवडणूकीत फक्त भाजपच विजयी होईल आणि पश्चिम बंगालमध्ये हिंदू राज्य अस्तित्वात येईल, असंही त्या म्हणाल्या.
दरम्यान राष्ट्रद्रोही कारवाया करणाऱ्या जनसमूदायाच्या लोकसंख्येवर नियंत्रण आणलं पाहिजे, असं विधानही साध्वी प्रज्ञाने केले आहे. क्षत्रिय हे देशाचे रक्षण करतात, त्यामुळं त्यांनी अधिक मुलं जन्माला घालायला हवीत. क्षत्रियांचा वंशच संपला तर देशाचं रक्षण कोण करणार, असंही साध्वी प्रज्ञा या कार्यक्रमात म्हणाल्या