CoronaMaharashtraUpdate : गेल्या २४ तासात आढळले ४ हजार २५९ नवे रुग्ण , ८० रुग्णांचा मृत्यू
राज्यात आज 4259 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली व आज नवीन 3949 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण 1753922 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात एकूण 73542 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 93.46% झाले आहे.#CoronaVirusUpdates
— Rajesh Tope (@rajeshtope11) December 12, 2020
गेल्या २४ तासात महाराष्ट्रात आज ४ हजार २५९ नवीन रुग्ण सापडले आहेत तर ८० जणांनी करोनामुळं आपला जीव गमावला आहे. सध्या राज्यात ७३ हजार ५४२ अॅक्टिव्ह रुग्ण उपचार घेत आहेत. तर, ३ हजार ९४९ रुग्णांनी करोनावर मात करुन घरी परतले आहेत. आतापर्यंत १७ लाख ५३ हजार ९२२ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळं राज्यातील रुग्ण बरे होण्याचा दर ९३. ४६ टक्के इतका झाला आहे.
राज्यातील कोरोना मृतांची एकूण संख्या ४८ हजार १३९ इतकी झाली असून राज्यातील मृत्यूदर २. ५७ टक्के इतका झाला आहे. राज्यात आतापर्यंत करोनाच्या १ कोटी १६ लाख ३८ हजार ३३६ चाचण्या पूर्ण करण्यात आल्या आहेत. त्यातील १८ लाख ७६ हजार ६९९ (१६.१३ टक्के) चाचण्यांचे अहवाल करोनासाठी पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या ५ लाख २५ हजार ६२३ व्यक्ती होम क्वारंटाइनमध्ये आहेत तर ४ हजार ५०० व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.
आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १ कोटी १६ लाख ३८ हजार ३३६ नमुन्यांपैकी १८ लाख ७६ हजार ६९९(१६.१३ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ५ लाख २५ हजार ६२३ व्यक्ती होम क्वारंटाईन आहेत. तर ४ हजार ५०० व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईन आहेत.
Maharashtra reports 4,259 new #COVID19 cases, 3,949 discharges, and 80 deaths today, as per State Health Department
Total cases 18,76,699
Total recoveries 17,53,922
Death toll 48,139Active cases 73,542 pic.twitter.com/8h6fcqA6RT
— ANI (@ANI) December 12, 2020