IndiaNewsUpdate : जेवणाला आधी स्पर्श केल्याच्या कारणावरुन दलित तरुणाची हत्या

मध्य प्रदेशच्या छत्तरपूर जिल्ह्यात केवळ जेवणाला स्पर्श केल्याच्या कारणावरुन दलित तरुणाला बेदम मारहाण करून त्याची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आली आहे. एका पार्टीसाठी हे तीन तरुण एकत्र जमले होते परंतु मयत दलित तरुणाने जेवणाला आधी हात लावला म्हणून त्याला कथित सवर्ण तरुणांनी लाठ्या -काठ्यांनी बेदम केली आणि त्यात या तरुणाचा मृत्यू झाला. ७ डिसेंबरला ही घटना घडली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, छत्तरपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील किशनपूर गावात ७ डिसेंबरला एका पार्टीसाठी हे तरुण एकत्र आले असता देवराज अनुरागी या दलित तरुणाने जेवणाला आपल्या आधी हात लावल्याने आरोपींचा संताप अनावर झाला. यावेळी दोघांनीही देवराजला काठीने मारहाण करण्यास सुरुवात केली. मारहाणीत देवराज बेशुद्ध पडला. आरोपींनी त्याला त्याच्या घरी सोडलं असता काही वेळातच त्याचा मृत्यू झाला”.
या प्रकरणी देवराजच्या कुटुंबाने आरोपींविरोधात तक्रार दाखल केली आहे. भूरा सोनी आणि संतोष पाल अशी आरोपांची नावे आहेत. पोलिसांनी दोघांविरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला असून शोध घेतला जात आहे. छत्तरपूरचे एसएसपी समीर सौरभ यांनी दिलेल्या माहितीनुसार, “दोन्ही आरोपी देवराजच्या घऱी गेले आणि मेजवानीसाठी आपल्यासोबत घेऊन गेले. दोन तासांनी त्यांनी देवराजला घऱी सोडलं. आपल्याआधी जेवणाला हात लावला म्हणून त्याला मारहाण झाल्याचा आरोप कुटुंबाने केला आहे”. पोलिसांना देवराजच्या शरिरावर जखमा आढळल्या आहेत. हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला असून सध्या आरोपींचा शोध घेतला जात आहे.