CoronaMaharashtraUpdate : नव्याने आढळून येणाऱ्या रुग्णांपेक्षा बऱ्या होणाऱ्या रुग्णांच्या संख्येत वाढ

महाराष्ट्रात दिवसभरात ५ हजार १११ रुग्ण करोनामुक्त झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आत्तापर्यंत राज्यात एकूण १७ लाख ४२ हजार १९१ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण अर्थात रिकव्हरी रेट हा ९३.४५ टक्के इतका झाला आहे. आज राज्यात ४ हजार ९८१ नवे करोना रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. तर राज्यात दिवसभरात ७५ मृत्यूंची नोंद झाली आहे. सध्या राज्यातील मृत्यू दर २.५७ टक्के इतका झाला आहे.
आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १ कोटी १४ लाख ४७ हजार ७२३ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १८ लाख ६४ हजार ३४८ नमुने पॉझिटिव्ह आहेत. सध्या राज्यात ५ लाख ४३ हजार ९१ व्यक्ती होम क्वारंटाइन आहेत. ५ हजार १०५ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइन आहेत. राज्यात आज घडीला ७३ हजार १६६ रुग्ण अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. आज राज्यात ४ हजार ९८१ रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्यातील करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या १८ लाख ६४ हजार ३४८ इतकी झाली आहे. आज नोंद झालेल्या ७५ मृत्यूंपैकी ६३ मृत्यू हे मागील ४८ तासातले आहेत. तर १२ मृत्यू हे मागील आठवड्यातले आहेत असंही आरोग्य विभागाने स्पष्ट केलं आहे.
औरंगाबाद जिल्ह्यात 42174 कोरोनामुक्त, 790 रुग्णांवर उपचार सुरू
औरंगाबाद जिल्ह्यात आज 123 जणांना (मनपा 92, ग्रामीण 31) सुटी देण्यात आली. आजपर्यंत 42174 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज एकूण 67 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 44124 झाली आहे. आजपर्यंत एकूण 1160 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण 790 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे. आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) आहे
मनपा (53)
मोंढा नाका (1), इटखेडा (2), पुंडलिक नगर, गारखेडा (1), अहिंसानगर (1), एन-9 रायगड नगर (1), एन-2 जयभवानी नगर (1), एन-2 राम नगर (2), दर्गा चौक (1), सातारा परिसर (2), देवळाई परिसर (1), पडेगाव (2), पदमपुरा (1), गणेश नगर, गारखेडा (2), पोतदार इंग्लिश स्कुल (1), गारखेडा (2), खडकेश्वर (1), एन-7 सिडको (1), शिवाजी नगर (1), अविष्कार कॉलनी (1), घाटी परिसर (1), शिल्प नगर (1), उस्मानपुरा (1), वेदांत नगर (1), टी.व्ही. सेंटर (1), समर्थ नगर (1), मुकुंद नगर (1), अन्य (21)
ग्रामीण (14)
कन्नड (1), अन्य (13)
Maharashtra reports 4,981 new COVID-19 cases which take caseload to 18,64,348; death toll reaches 47,902 with 75 new fatalities: health official
— Press Trust of India (@PTI_News) December 9, 2020