पालघर वगळता शिवसेनेची पहिली १९ उमेदवारांची यादी झाली आऊट , दोन बदल वगळता तेच उमेदवार

लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यानंतर उमेदवारांची नावं जाहीर करण्याची लगबग सुरु झाली आहे. भाजपनंतर आता शिवसेनेनेही राज्यातील उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. युती झाल्यानंतर राज्यातील ४८ जागांपैकी भाजप २५ तर शिवसेना २३ जागा लढवणार आहे. हे २१ उमेदवार शिवसेनेने घोषित केले आहेत. तर पालघर आणि सातारा या जागांचे उमेदवार रविवारी जाहीर होतील.
पहिल्या यादीतील २१ पैकी १९ विद्यमान खासदारांना उमेदवारी देण्यात आली आहेत. तर हिंगोली आणि उस्मानाबाद या दोन जागांमध्ये बदल करण्यात आले आहेत. हिंगोलीत हेमंत पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहेत. उस्मानाबादमध्ये ओमराजे निंबाळकर यांना तिकीट देण्यात आलं आहे.
शिवसेनेचे संभाव्य उमेदवार
दक्षिण मुंबई -अरविंद सावंत
दक्षिण मध्य मुंबई – राहुल शेवाळे
उत्तर-पश्चिम मुंबई – गजानन किर्तीकर
ठाणे – राजन विचारे
कल्याण – श्रीकांत शिंदे
रायगड – अनंत गीते
रत्नागिरी-सिंधुदुर्ग – विनायक राऊत
कोल्हापूर – संजय मंडलिक
हातकणंगले – धैर्यशिल माने
नाशिक – हेमंत गोडसे
शिर्डी – सदाशिव लोखंडे
शिरुर – शिवाजीराव आढळराव-पाटील
औरंगाबाद – चंद्रकांत खैरे
यवतमाळ-वाशिम – भावना गवळी
बुलडाणा – प्रतापराव जाधव
रामटेक – कृपाल तुमाणे
अमरावती – आनंदराव अडसूळ
परभणी- संजय जाधव
मावळ – श्रीरंग बारणे
हिंगोली – हेमंत पाटील
उस्मानाबाद – ओमराजे निंबाळकर
Very nice. Keep it up
Thanks for comment