IndiaCrimeUpdate : स्वतःच्या पत्नीसह ६ जणांवर घातले कुऱ्हाडीचे घाव , चौघांचा मृत्यू , “त्याने ” दिला अजब कबुली जबाब !!

बिहारच्या शिवानंद जिल्ह्यात एका व्यक्तीने पत्नी आणि पाच मुलांवर ुर्हाडीचे वार केल्यामुळे चार मुलांचा जागीच मृत्यू झाला असून आरोपीची पत्नी आणि एक मुलगी गंभीर जखमी झाली आहे. या दोघींचीही प्रकृती चिंताजनक आहे. आपल्या अंगात कोणीतरी प्रवेश केला आणि त्याने आपल्या कुटुंबियांवर कुर्हाडीचे घाव घातले असा कबुली जबाब आरोपीने पोलिसांना दिला. हे कृत्य घडल्यानंतर आपण स्वतःच पोलिसांना माहिती दिली आणि त्यांनी मला अटक केली असेही त्याने सांगितले.
याप्रकरणी पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की , सिवान मधील भगवानपुर पोलिस ठाण्याच्या हद्दीत बल्हा गावातील नागरिक असलेल्या या ग्रामस्थाने त्याची पत्नी आणि मुले मुली अशा एकूण सहा कुटुंबीयांवर ुर्हाडीचे घाव घालत क्रूर हल्ला केला . या हल्ल्यात चार जणांचा जागीच मृत्यू झाला तर पत्नी आणि मुलगी गंभीर जखमी झाली. त्यांना प्रारंभी सिवान मधील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे परंतु या दोघींचीही प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना पाटणा येथील शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले आहे.
या प्रकरणात पोलिसांनी आरोपीला अटक केली असून आरोपीने स्वतः सांगितले की घटना घडल्या नंतर मी स्वतः पोलिसांना आणि डीएमला फोन केला परंतु त्यांनी तो उचलला नाही . या हल्ल्यात त्याची मुलगी ज्योतिकुमारी, मुलगा अभिषेक कुमार , मुकेश कुमार आणि भोला कुमार यांचा जागीच मृत्यू झाला तर मुलगी अंजली कुमारी आणि पत्नी रीता देवी यांची प्रकृती चिंताजनक आहे. ” आम्ही बाहेरून आल्यानंतर माझ्या शरीरात कोणीतरी घुसला आणि त्यानेच मला कुऱ्हाड उचलून कुटुंबीयांना मारण्यास सांगितलं , त्यामुळे मी कुऱ्हाड उचलली आणि कुटुंबियांवर घाव घातले असे आरोपीने पोलिसांना सांगितले.