Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

CoronaMaharashtraUpdate : गेल्या २४ तासात आढळले ६१५९ नवे रुग्ण , ४८४४ रुग्णांना डिस्चार्ज

Advertisements
Advertisements
Spread the love

गेल्या २४  तासात राज्यात ६ हजार १५९ नवे करोना रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यामुळे राज्यातील करोना रुग्णांची एकूण संख्या १७ लाख ९५ हजार ९५९ इतकी झाली आहे. राज्यात मागील २४ तासांमध्ये ६५ मृत्यूंची नोंद झाली आहे. महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाने ही माहिती दिली आहे.

Advertisements

महाराष्ट्रात मागील चोवीस तासांमध्ये ४ हजार ८४४ रुग्ण करोना मुक्त झाले आहेत. आत्तापर्यंत महाराष्ट्रात एकूण १६ लाख ६३ हजार ७२३ रुग्णांनी करोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण अर्थात रिकव्हरी रेट हा ९२.६४ टक्के इतका झाला आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १ कोटी ४ लाख ५६ हजार ९६२ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १७ लाख ९५ हजार ९५९ नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.

Advertisements
Advertisements

सध्या राज्यात ५ लाख २९ हजार ३४४ व्यक्ती होम क्वारंटाइन आहेत. तर ६ हजार ९८० व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइन आहेत. राज्यात आज घडीला ८४ हजार ४६४ रुग्ण अॅक्टिव्ह आहेत. आज राज्यात ६ हजार १५९ नव्या करोना रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्यातील करोना बाधितांची एकूण संख्या १७ लाख ९५ हजार ९५९ इतकी झाली आहे. आज नोंदवण्यात आलेल्या ६५ मृत्यूंपैकी ५६ मृत्यू हे मागील ४८ तासांमधले आहेत. तर ९ मृत्यू हे मागील आठवड्यातले आहेत अशीही माहिती महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाने दिली आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!