BiharPoliticalNewsUpdate : मावळत्या उपमुख्यमंत्र्यांबाबत मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी दिली हि प्रतिक्रिया

It is the decision of the BJP to not field Sushil Modi as the Deputy Chief Minister. They should be asked about this: Bihar Chief Minister Nitish Kumar https://t.co/zWyDZ3FBRt
— ANI (@ANI) November 16, 2020
बिहारच्या निवडणुकीत प्रत्यक्षात कमी जागा येऊनही शब्द दिला म्हणून भाजपने एनडीएचे नेते म्हणून नितीश कुमार यांना आग्रहपूर्वक सातव्यांदा बिहारच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्यास भाग पाडले आहे. मात्र भाजपने यावेळी माजी उपमुख्यमंत्री सुशीलकुमार मोदी यांचा पत्ता कट करत, भाजपाकडून तारकिशोर प्रसाद व रेणू देवी यांना उपमुख्यमंत्री म्हणून संधी दिली आहे. या बद्दल नितीश कुमार यांना विचारण्यात आलेल्या प्रश्नावर त्यांनी हा भाजपाचा निर्णय असल्याचं सांगत अधिक बोलण्यास नकार दिला आहे.
या बाबत बोलताना नितीशकुमार म्हणाले कि , ”सुशीलकुमार मोदी यांना उपमुख्यमंत्री न बनवण्याचा निर्णय हा भाजपाचा आहे. त्यांना याबद्दल विचारलं पाहिजे.” ”जनतेच्या निर्णयाच्या आधारावर एनडीएने पुन्हा एकदा राज्यात सरकार स्थानप केलं आहे. आम्ही सोबत काम करू व जनतेची सेवा करू.” असं देखील नितीश कुमार यांन यावेळी सांगितलं. तर, या अगोदर तुम्हाला सुशीलकुमार मोदी यांची आठवण येत आहे का? असं नितीश कुमार यांना विचारण्यात आल्यावर त्यांनी ‘होय’ असं एका शब्दात उत्तर दिलं.