धक्कादायक , लज्जास्पद, अमानवी : सख्या भावांनी अल्पवयीन बहिणीवर बलात्कार करून ओळख पटू नये म्हणून शिर केले धडा वेगळे !!

Advertisements
Advertisements
Spread the love

मध्य प्रदेशच्या तालुका बंडा , सागर जिल्ह्यातला आहे हा धक्कादायक प्रकार आहे . मागच्या आठवड्यात १२ वर्षाच्या मुलीचा मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली उडाली होती . शिराविना आढळलेल्या या अल्पवयीन मुलीचा तपस करता करता पोलिसांच्या नाकी नऊ आले पण त्यांनी या मुलीचा शोध शेवटी लावलाच.  या तपासात जे समजले ते फारच भयंकर , लज्जास्पद आणि अर्थातच धक्कादायक होते .

Advertisements

पोलिसांच्या तपासानुसार आणि माहितीनुसार या चिमुरडीवर तिच्याच ३ भावांनी आणि काकाने सामूहिक बलात्कार केला होता. या  सामूहिक बलात्कारानंतर  याची वाच्यता होऊ नये म्हणून भावांनी आणि काकाने चिमुरडीचं शिर धडापासून वेगळं केलं. पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणात ३ भाऊ आणि एका काकाला ताब्यात घेण्यात यश मिळवलं  आहे. आणि या तिघांनीही त्यांच्या कृष्ण कृत्याची धक्कादायक कबूली दिली आहे. मुख्य आरोपी रामदास अहिरवार बेपत्ता असून त्याच्या माहितीसाठी पोलिसांनी २५ हजाराचे बक्षीस ठेवले आहे.

Advertisements
Advertisements

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलीचा सगळ्यात मोठा भाऊ हा २२ वर्षांचा आहे. ज्या दिवशी हा प्रकार झाला तेव्हा त्याने पीडित मुलीला शाळेत न पाठवता आपल्या काकाच्या घरी नेले होते. तिथे त्याने तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर ४० वर्षीय काकानेही तिच्यावर बलात्कार केला. आरोपींनी पीडितेवर अप्राकृतिक कृत्य केल्याचं मृतदेह तपासणी अहवालात समोर आले आहे .

सामूहिक बलात्कार केल्यानंतर हा प्रकार मी पोलिसांना आणि आई-वडिलांना सांगणार असल्याचं पीडित मुलगी म्हणाली. यानंतर आरोपींनी विळ्याने मुलीचे शिर धडापासून वेगळे केले आणि मृतदेह शेतात फेकून दिला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पहिला बलात्कार मुलीच्या मोठ्या भावाने तिच्यावर  केला.

विशेष म्हणजे मुलीच्या काकुलाही   या प्रकरणाची संपूर्ण माहिती होती. पण मुलीला या सैतानाच्या  तावडीतून वाचवण्याचं सोडून तिने नवऱ्याला आणि पुतण्यांना  साथ तर दिलीच पण मोठ्या हुशारीने तिने मुलीच्या बेपत्ता होण्याचा आरोप शेजाऱ्यांवर लगावला. सागरचे एसपी अमित संघी यांनी सांगितलं की, या प्रकरणात पोलिसांनी पीडित मुलीच्या काकूला देखील आरोपी घोषित केलं आहे. गुरुवारी पीडित मुलगी शाळेतून अद्याप परतली नसल्याची तक्रार तिच्या आई-वडिलांनी पोलिसांत केली. त्याच्या अवघ्या ८ तासातच मुलीचा मृतदेह शेतात आढळून आला होता. या प्रकरणामुळे आरोपींविरुद्ध संतापाची भावना व्यक्त होत आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!