बँक घोटाळ्यातील फरार आरोपी निरव मोदींच्या अखेर आवळल्या मुसक्या

Advertisements
Advertisements
Spread the love

13 हजार कोटी रुपयांचा घोटाळा करून फरार झालेला पंजाब नॅशनल बँक घोटाळ्यातील मुख्य आरोपी नीरव मोदीला अखेर अटक करण्यात आली आहे. कर्जबुडव्या नीरव मोदीला लंडनमध्ये बेड्या ठोकल्या आहेत. आज त्याला वेस्टमिंस्टर कोर्टात हजर केलं जाणार आहे. आता त्याच्या भारतातील प्रत्यार्पणबाबतच्या प्रकरणावर सुनावणी होईल. घोटाळा उघड होण्याआधीच त्याने भारतातून पळ काढला होता.

Advertisements

काही दिवसांपूर्वीच नीरव मोदीला पकडण्यासाठीवेस्टमिंस्टर कोर्टाकडून अटक वॉरंट जारी करण्यात आलं होतं. सीबीआयने इंटरपोल आणि यूके अथोरिटीजशी संपर्क करुन नीरव मोदीविरोधात रेड कॉर्नर नोटीसचा संदर्भ देत कारवाई करत त्याला अटक करण्याची मागणी केली होती. यानंतर नीरव मोदीला कधीही अटक होऊ शकते असं म्हटलं जात होत. अखेर आज त्याला अटक करण्यात आली.

Advertisements
Advertisements

 

आपलं सरकार

Click to listen highlighted text!