IndiaNewsUpdate : काँग्रेसनेते अहमद पटेल अतिदक्षता कक्षात दाखल

— Faisal Ahmed Patel (@mfaisalpatel) November 15, 2020
कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल यांना गुरुग्रामच्या मेदांता रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यांच्यावर आयसीयूम वॉर्डमध्ये उपचार करण्यात येत आहे. त्यांच्या कुटुंबीयांनी रविवारी ही माहिती दिलीआहे. अहमद पटेल यांना काही आठवड्यांपूर्वी कोरोनाचा संसर्ग झाला होता. अहमद पटेल (वय ७१) यांनी १ ऑक्टोबरला याबाबत ट्विट केलं होतं. आता त्यांना पुढील उपचारासाठी त्यांना गुरुग्राममधील मेदांता रुग्णालयाच्या आयसीयूमध्ये दाखल करण्यात आलं आहे, असं फैझल यांनी ट्विटमधून कळविले आहे.
दरम्यान अहमद पटेल यांची प्रकृती स्थिर आहे आणि त्यांच्यावर डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरू आहेत. ते लवकरात लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना करावी अशी विनंती करतो’, असे फैझल यांनी म्हटले आहे. अहमद पटेल लवकरच बरे व्हावेत, यासाठी कॉंग्रेसच्या अनेक नेत्यांनी प्रार्थना केली आहे. कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते आनंद शर्मा यांनी म्हटले आहे कि , ‘आपले मित्र आणि कॉम्रेड अहमद पटेल यांच्याबद्दल खूप चिंता वाटते आहे आणि त्यांच्या प्रकृतीसाठी प्रार्थना करतो.” त्यांची प्रकृती लवकर चांगली व्हावी, यासाठी आपणही प्रार्थना करा’.