MaharashtraNewsUpdate : मृतदेह घेऊन जाणाऱ्या रुग्णवाहिकेला भीषण अपघात ३ ठार ७ जखमी

सोलापूर-पुणे राष्ट्रीय महामार्गावर एका रुग्णवाहिकेला भीषण अपघात झाला आहे. या अपघातात रुग्णवाहिकेतील ३ जण जागीच ठार झाले आहे. तर सात जण जखमी झाले आहे. आज सकाळी ही घटना घडली. एका मृतदेहाला घेऊन जात असताना हा अपघात झाला आहे. पुण्यात मृत झालेल्या व्यक्तीला हैद्राबादकडे नेण्यात येत होते. मोहोळ इथं पोहोचल्यानंतर शहरातील कन्या प्रशाळेसमोर रुग्णवाहिकेला अपघात झाला. भरधाव वेगात असलेल्या मालट्रकने रुग्णवाहिकेला पाठीमागून जोरात धडक दिली.
हा अपघात इतका भीषण होता की, यात रुग्णवाहिकेच्या समोरच्या भागाचा चुराडा झाला आहे. रुग्णवाहिकेमध्ये एकूण १७ लोकं होती. या अपघातात ड्रायव्हरसह ३ जणांचा जागीच मृत्यू झाला. तर या अपघातात ७ जण जखमी झाले आहे. जखमींना नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.