MaharashtraNewsUpdate : दिवंगत पत्रकारांना ५० लाखांची मदत मिळण्यास अद्याप कॅबिनेटची मंजुरी नाही – राजेश टोपे

औरंगाबाद – कोरोना संक्रमण काळात वार्तांकन करतांना मृत्यू झालेल्या पत्रकारास ५० लाख रु.मदत मिळण्याच्या प्रस्तावाला कॅबीनेटकडून अद्याप मंजूरी मिळालेली नाही.असे स्पष्टीकरण सार्वजनिक आरोग्य तथा कुटुंबकल्याण मंत्री राजेश टोपे यांनी महानायक शी बोलतांना दिले.
केंद्र सरकारने या मदतीसाठी पुढाकार घेतल्यास अशी मदत वार्तांकन करतांनाकोरोनामुळे दिवंगत झालेल्या पत्रकारांना मिळैल अशी भूमीका कॅबीनेट ने घेतल्यामुळे हा प्रस्ताव प्रलंबित आहे असेही टोपे म्हणाले. आता पर्यंत राज्यात कोरोनामुळे २०पत्रकारांचा मृत्यू झाला असून कॅबीनेट च्या भूमीके मुळे दिवंगत पत्रकारांना मदत मिळण्यास खूपच उशीर होतोय ही वस्तूस्थिती असल्याचे महाआघाडी सरकारने मान्य केले. या संदर्भात कोरोनामुळे दगावलेल्या पत्रकारांना महाआघाडीतील काही मंत्री वैयक्तीक पातळीवर मदंत करंत असल्याचे चित्र बर्याच वेळा दिसंत असल्याचे त्यांनी मान्य केले