उपवास करण्यास मनाई केल्याने कोरोनाबाधित महिलेची आत्महत्या

उत्तर प्रदेशातील इटावा येथील सैफई वैद्यकीय विद्यापाठामध्ये करोना पॉझिटिव्ह महिलेने उपवास करण्यास मनाई केल्यालाने रुग्णालयाच्या, इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी घेत आत्महत्या केली. या महिलेचा जागीच मृत्यू झाला, असल्याची माहिती रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली आहे.
मैनपुरी जिल्ह्यातील रहिवासी असलेली ही महिला मेंदूच्या आजाराने ग्रस्त होती. त्यामुळे तिला २७ ऑक्टोबरला महिलांच्या न्यूरो-सर्जरी विभागात उपचारासाठी दाखल केले होते. दरम्यान, २९ ऑक्टोबरला तिची कोविड चाचणी पॉझिटिव्ह आल्याने तेव्हा तिला रुग्णालयाच्या तिसऱ्या मजल्यावरील आयसोलेशन वॉर्ड मध्ये हलविण्यात आले होते. तिची करोना चाचणी पॉझिटिव्ह आल्याने तिला करवा चौथसाठी उपवास करण्यास मनाई केली, त्यामुळे या महिलेने रुग्णालयाच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. या महिलेचा जागीच मृत्यू झाला, असल्याची माहिती रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली आहे.
सैफई मेडिकल युनिव्हर्सिटीमध्ये आत्महत्या केल्याची ही पहिलीच घटना नाही. २०१६ मध्ये एका कैद्यानेही इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केली होती. २०१७ मध्ये रूग्णालयातीलच एका क्षयरोगग्रस्त रूग्णानं आजारपणाला कंटाळून आत्महत्या केली होती.