BiharElectionNewsUpdate : कोण म्हणतं की भाजपाला हरवलं जाऊ शकत नाही? चिदंबरम यांचे हे उत्तर बघा

2019 के बाद से इन क्षेत्रों के चुनावों या उप-चुनावों में, भाजपा उम्मीदवारों ने 381 में से केवल 163 में ही जीत हासिल की।
किसने कहा कि भाजपा को हराया नहीं जा सकता है? विपक्षी दलों को यह विश्वास करना होगा कि वे भाजपा को हरा सकते हैं।
मुझे उम्मीद है कि यह बिहार में साबित होगा।— P. Chidambaram (@PChidambaram_IN) November 1, 2020
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांनी दरम्यानच्या काळात झालेल्या निवडणूक निकालाचा अभ्यास करून काँग्रेससह विरोधी पक्षांचे मनोबल उंचावण्याच्या दृष्टीने मतांच्या आकडेवारीचा दाखला देऊन एक ट्विट केले आहे . या ट्विटमध्ये म्हटले आहे कि , ”२०१९ च्या लोकसभा निवडणुकीनंतरच्या सर्वेक्षणांनंतर असे समोर आले आहे की, भाजपाला हरवले जाऊ शकते व मला अपेक्षा आहे की बिहारच्या निकालानंतर हे सिद्ध होईल.” असं त्यांनी म्हटलं आहे.
”कोण म्हणतं की भाजपाला हरवलं जाऊ शकत नाही? विरोधकांना विश्वास असायला हवा की ते भाजपाला हरवू शकतात. मला अपेक्षा आहे की बिहारमध्ये ही गोष्ट सिद्ध होईल.” असं त्यांनी ट्विट केलं आहे.चिदंबरम अन्य एका ट्विटमध्ये म्हणातात की, २०१९ च्या लोकसभा निवडणुकीनंतर एकूण ३८१ (३३० विधानसभा निवडणुका आणि ५१ विधानसभा पोट निवडणुका) विधानसभा जागांवर झालेल्या निवडणुकीत भाजपाने उमेदवार उतरवले होते. या पैकी केवळ १६३ जागांवरच त्यांना विजय मिळाला. तर, २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपाने याच ३८१ विधानसभा क्षेत्रांपैकी लोकसभेच्या ३१९ जागांवर विजय मिळवला होता. यावेळी त्यांनी महाराष्ट्र, झारखंड आणि हरियाणा येथील विधानसभा निवडणुकीच्या निकालाचा संदर्भ दिल्याचे दिसून आले.
सध्या बिहारमध्ये २४३ विधानसभा जागांसाठी तीन टप्प्यांमध्ये निवडणूक होत असून पहिल्या टप्प्यातील मतदान २८ ऑक्टोबर रोजी झाले. दुसऱ्या टप्प्यातील मतदान ३ नोव्हेंबर रोजी व तिसऱ्या टप्प्यातील मतदान ७ नोव्हेंबर रोजी असणार आहे. तर मतमोजणी १० नोव्हेंबर रोजी होणार आहे.