लोकसभा २०१९ : भाजप नेत्यांची पातळी घसरली, म्हणाले मायावती केस काळे करतात…

उत्तर प्रदेशातील भाजपा आमदार सुरेंद्र नारायण सिंह यांनी बसपाच्या सर्वेसर्वा मायावती यांच्यावर टीका करताना अत्यंत आक्षेपार्ह भाषा वापरली आहे. मायावती यांनी मंगळवारी सकाळी नाव न घेता पंतप्रधान मोदींवर टीका केली होती. शाही जीवन जगणाऱ्या व्यक्तीने मागच्या लोकसभा निवडणुकीच्यावेळी मतांसाठी स्वत:ला चायवाला म्हटले होते आणि आता स्वत:ला चौकीदार म्हणत आहे अशी टीका मायावती यांनी टि्वटमधून केली होती.
त्यावर भाजपा आमदार सुरेंद्र नारायण सिंह यांनी मायावती स्वत: रोज फेशिअल करतात. त्या कुठल्या आधारावर आमच्या नेत्याला शौकीन म्हणतात. कपडे घालणे हा शौकीनपणा नाही. केस पांढरे झालेले असताना ते रंगवून मायावती अजूनही आपण तरुण आहोत हे सिद्ध करतात. मायावती ६० वर्षांच्या झाल्या पण अजूनही त्यांचे सर्व केस काळे आहेत असे सुरेंद्र नारायण सिंह म्हणाले.