WorldNewsUpdate : CoronaEffect : भारतचे लोण अमेरिकेपर्यंत !! निवडणूक प्रचारात , ” जो ” काय म्हणाले तुम्हीच पहा…

भारतात बिहारमध्ये विधानसभा निवडणुकांचा प्रचार जोरात सुरु आहे . या प्रचारा दरम्यान देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी बिहार निवडणुकीत आम्हाला मतदान केल्या बिहारमधील लोकांना कोरोनाची लस मोफत देऊ असे आश्वासन दिले आहे . त्यांच्या या वक्तव्यावरून विरिधि पक्षांकडून टीका केली जात असताना भारतातील याच निवडणूक प्रचाराचे लोण थेट अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणूक प्रचारापर्यंत गेले असल्याचे दिसत आहे .
भाजपच्या चालीवर डेमोक्रॅटिक पक्षाचे राष्ट्राध्यक्ष पदासाठी उमेदवार जो बायडेन यांनी म्हटले आहे कि , आपण निवडून आलो तर मोफत करोनाची लस देण्यात येईल. कोरोना व्हायरससोबत लढण्यासाठी हि एक राष्ट्रीय योजना असल्याचे त्यांनी म्हटले आहे. जेंव्हा कोरोना व्हायरसवरील सुरक्षित आणि उपयोगी अशी लस येईल तेव्हा अमेरिकेतल्या प्रत्येक नागरिकाला ही लस मोफत देण्यात येईल. जर एखाद्या व्यक्तीचा विमा नसेल त्याला ही लस मोफत देण्यात येणार असल्याचे बिडेन यांनी सांगितले. जर मी निवडणूक जिंकलो तर कोरोनासोबत लढण्यावर सगळे लक्ष केंद्रित करणार असल्याचे त्यांनी सांगितले. बायडेन यांनी एका प्रचार सभेत जनतेसोबत संवाद साधताना हे आश्वासन दिले आहे.
दरम्यान शुक्रवारी अध्यक्षीय पदासाठीच्या अंतिम चर्चेदरम्यान अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी येत्या काही आठवड्यांत कोरोनावरील लस जाहीर केली जाईल असा दावा केला होता. कोरोनाचा सर्वाधिक फटका हा अमेरिकेला बसला आहे. अमेरिकेत कोरोनाने आतापर्यंत दोन लाखांहून अधिक लोकांचा बळी घेतला आहे. जो बायडेन यांनी प्रचारसभेत याच मुद्द्यांच्या आधारे ट्रम्प प्रशासानावर टीका केली आहे. अमेरिकेत ३ नोव्हेंबरला राष्ट्राध्यक्ष पदासाठी निवडणूक होणार आहे. त्यामुळे प्रचाराने वेग पकडला आहे. “आम्ही आठ महिन्यांहून अधिक करोना विरोधात लढा देत आहोत आणि आतापर्यंत अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कोरोनाशी सामना करण्यासाठी कोणतीही योजना आणलेली नाही. त्यांनी हार पत्करली आहे ” असे बायडेन म्हणाले.