MaharashtraNewsUpdate : देवेंद्र फडणवीस यांना कोरोना , म्हणाले काही काळ विश्रांती घ्यावी हि परमेश्वराची इच्छा असावी, काळजी घ्या…

लॉकडाऊन सुरू झाल्यापासून आलेला प्रत्येक दिवस हा कार्यरत राहण्यात गेला. पण आता काही काळ विश्रांती घेतली पाहिजे, अशी परमेश्वराची इच्छा असावी.
माझी कोविड चाचणी पॉझिटिव्ह आली असून मी स्वतःला आयसोलेट केले आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषधोपचार घेतो आहे.— Devendra Fadnavis (Modi Ka Parivar) (@Dev_Fadnavis) October 24, 2020
भाजपचे विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कोरोनाची लागण झाली आहे. फडणवीस यांनी स्वतःच ट्विटरवरून याची माहिती दिली आहे. कोरोनाची साथ आल्यापासून मी दिवसरात्र काम करतो आहे. मात्र आता मी ब्रेक घ्यावा असं देवाला वाटत असेल. माझी कोविड टेस्ट पॉझिटिव्ह आली असून क्वारंटाईन होत असल्याचं फडणवीस यांनी सांगितलं आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषधोपचार घेत असल्याचं त्यांनी सांगितलं.
देवेंद्र फडणवीस यांनी ट्वीट करुन सांगितले की, “लॉकडाऊन सुरू झाल्यापासून आलेला प्रत्येक दिवस हा कार्यरत राहण्यात गेला. पण आता काही काळ विश्रांती घेतली पाहिजे, अशी परमेश्वराची इच्छा असावी. माझी कोविड चाचणी पॉझिटिव्ह आली असून मी स्वतःला आयसोलेट केले आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषधोपचार घेतो आहे. माझ्या संपर्कात आलेल्यांनी स्वतःची चाचणी करून घ्यावी. सर्वांनी स्वतःची काळजी घ्यावी !
दरम्यानच्या काळात फडणवीस हे गेली अनेक दिवस महाराष्ट्राच्या दौऱ्यावर होते. आणि नंतर ते बिहारमध्येही प्रचारासाठी गेले होते. गेले काही दिवस ते ओला दुष्काळाच्या पाहणीसाठी दौऱ्यावर होते. सुरूवातीच्या टप्प्यात कोरोनाच्या आढाव्यासाठी फडणवीस यांनी विभागवार दौरे केले. राज्याच्या सगळ्या भागात जाऊन त्यांनी हॉस्पिटल्सला भेटी देत सरकारी अधिकाऱ्यांशी चर्चा केली होती.