IndiaNewsUpdate : केंद्र सरकारकडून व्हिसा वरील निर्बंध शिथील, विदेशी नागरिक आता भारतात येऊ शकतात , पर्यटनावरील बंदी मात्र कायम

Under this graded relaxation, Government to restore with immediate effect all existing visas (except electronic visa, Tourist Visa & Medical Visa). Foreign nationals intending to visit India for medical treatment can apply for a Medical Visa including for medical attendants: MHA https://t.co/pusOKpPz2g
— ANI (@ANI) October 22, 2020
केंद्र शासनाच्या नवीन निर्णयानुसार भारतात येणाऱ्या किंवा राहणाऱ्या विदेशी नागरिकांची व्हिसाची मुदत संपली असेल तर, ते नव्याने व्हिसासाठी अर्ज करु शकतात. या निर्णयामुळे व्यवसाय, कॉन्फरन्स, नोकरी, अभ्यास, संशोधन आणि वैद्यकीय उपचारांसाठी परदेशी नागरिक भारतात येऊ शकतात. कोरोना व्हायरसचा फैलाव रोखण्यासाठी लॉकडाऊन जाहीर झाल्यापासून व्हिसावर सुद्धा निर्बंध घालण्यात आले होते. अनलॉक ५.० अंतर्गत बऱ्याच गोष्टी सुरु झालेल्या असताना केंद्र सरकारने आता व्हिसा वरील निर्बंध सुद्धा शिथील केले आहेत. ओसीआय आणि पीआयओ कार्डधारकांना तसेच परदेशी नागरिकांना भारतात यायचे असेल, तर त्यांना हवाई आणि समुद्री मार्गाने प्रवेश करण्यास परवानगी देण्यात आली आहे. फक्त पर्यटन व्हिसाला अजून परवानगी देण्यात आलेली नाही. इलेक्ट्रॉनिक व्हिसा आणि पर्यटक व्हिसा वगळता सर्व व्हिसा तात्काळ प्रभावाने पूर्ववत करण्यात येत असल्याचे केंद्रीय गृहमंत्रालयाकडून जाहीर करण्यात आले आहे. परदेशी नागरिकांना वैद्यकीय उपचारासाठी भारतात यायचे असेल, तर ते त्यांच्यासह देखभाल करणाऱ्या व्यक्तींच्या वैद्यकीय व्हिसासाठी अर्ज करु शकतात.