IndiaNewsUpdate : पंतप्रधान म्हणाले कोरोनावर मात करण्यात भारत जगात भारी , लस निर्मितीपासून ते सर्वच पातळ्यांवर भारत आघाडीवर …

#WATCH| India has one of the highest recovery rates of 88%. This happened because India was one of the first countries to adopt a flexible lockdown….India is now at forefront of vaccine development for COVID-19: PM Narendra Modi at Grand Challenges Annual Meeting pic.twitter.com/3Joq8PBbGa
— ANI (@ANI) October 19, 2020
वैश्विक मुद्द्यांवर होणाऱ्या ग्रँड चॅलेंजेसच्या ऑनलाइन वार्षिक बैठकीत बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोनाच्या बाबतीत भारत जगात भारी असल्याचे सांगून सुरुवातीच्या काळातच भारतात लवचिक लॉकडाउन जाहीर केल्यानं आज करोना बाधितांचा रिकव्हरी रेट ८८ टक्के आहे,असल्याचे ठाम प्रतिपादन केले. मोदी म्हणाले कि , “भारताचा जगातील इतर देशांच्या तुलनेत कोरोना बाधितांची संख्या कमी होत आहे आणि रिकव्हरी रेट ८८ टक्क्यांवर पोहोचला आहे. हे घडू शकलं कारण भारत हा सुरुवातीच्या काळातच काहीसे रुग्ण आढळून आले होते तेव्हाच लवचिक लॉकडाउनचे धोरण अवलंबणाऱ्या देशांपैकी एक होता. त्याचबरोबर लोकांना मास्क वापरण्यास प्रोत्साहित करणाऱ्या सुरुवातीच्या देशांमध्ये होता. त्याचबरोबर भारतानं प्रभावी पद्धतीने कॉन्टॅक्ट ट्रेसिंगचे काम केले. सुरुवातीलाच रॅपिड अँन्टजेन टेस्ट लागू करणाऱ्या देशांमध्येही भारत होता.”
पंतप्रधान असेही म्हणाले कि , “आपण सुरुवातीला अनेक पावलं उचलली ज्यामुळे आरोग्य सुविधा सुधारली. सॅनिटायझेशन, स्वच्छतेवर भर दिला याचा सर्वाधिक फायदा गरिबांना आणि कमजोर लोकांना होत आहे. त्याचबरोबर भारत हा कोरोनावर लस बनवण्याच्या कार्यात आघाडीवर आहे. जगातील ६० टक्के लस निर्मिती ही भारतात होते. भारत वैश्विक आरोग्य सेवा निर्मितीमध्येही आघाडीवर आहे,” असेही मोदी यावेळी म्हणाले. “भविष्यात एक असा समाज तयार होईल जो विज्ञान आणि संशोधनात गुंतवणूक करेल. यासाठी आपल्याला दूरदृष्टीने गुंतवणूक करावी लागेल तेव्हाचा याचा फायदा होईल. या बैठकीचे आयोजन भारतात होणार होतं मात्र करोना महामारीमुळं याचं व्हर्च्युअल आयोजन करण्यात आलं. तंत्रज्ञानाची एवढी मोठी ताकद आहे की महामारीच्या काळातही आपल्याला ती वेगळी करु शकली नाही,” अशा शब्दांत मोदींनी तंत्रज्ञानाचा गौरव केला. थोडक्यात काय तर मोदी म्हणाले कोरोनाच्या बाबतीत भारतात ऑल इज वेल !!
दरम्यान काँग्रेसनेते राहुल गांधी यांनी आपल्या एका ट्विटद्वारे जगाच्या तुलनेने भारत कुठे आहे ? याची आकडेवारी दिली आहे. या आकडेवारीनुसार भारताचा मृत्यू दर मिनिटाला ८८ असा आहे तर जीडीपी -१०.३% इतका घसरला आहे .
How to completely destroy an economy and infect the maximum number of people really quickly. pic.twitter.com/5kbMpmnIpZ
— Rahul Gandhi (@RahulGandhi) October 19, 2020