MarathawadaNewsUpdate : राज्य सरकारला मर्यादा आहेत , येत्या १० दिवसात पंतप्रधानांना भेटण्याचे पवारांचे शेतकऱ्यांना आश्वासन

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे अतिवृष्टीमुळे उद्ध्वस्त झालेल्या शेतकऱ्यांना भेटण्यासाठी मराठवाड्यात आले आहेत. उस्मानाबादमधील अतिदृष्टीमुळे नुकसान झालेल्या भागाची पाहणी करत आहे. तुळजापूरमध्ये पाहणी केल्यानंतर ‘येत्या १० दिवसांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहोत. महाराष्ट्राला केंद्रानं मदत करावी’, अशी मागणी करणार असल्याचं शरद पवार म्हणाले आहे. परतीचा पावसामुळे नुकसान झालेल्या शेतीची पाहणी करण्यासाठी शरद पवार उस्मानाबादेत दाखल झाले आहे. शहरात दाखल झाल्यानंतर शरद पवार यांनी लोहारा तालुक्यातील सास्तुर गावामध्ये शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या. ‘शेतकऱ्यांना तात्काळ मदत करता येणार नाही, केंद्र सरकारने यासाठी पुढाकार घेऊन भरीव मदत करावी. राज्य सरकारला मदत करण्यासाठी मर्यादा आहेत’ असं मत शरद पवार यांनी व्यक्त केले आहे.
शेतकऱ्यांना धीर देताना ते म्हणाले कि , परतीच्या पावसामुळे कधीही न भरून येणार नुकसान झाले आहे. पण , या संकटाला खचून न जाता एका धीराने सामना करावा लागेल, शेतकऱ्यांच्या मदतीसाठी खासदारांच शिष्टमंडळ घेवून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहे, असंही शरद पवार यांनी सांगितले. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आजपासून पूरग्रस्त भागांच्या पाहणीसाठी दौऱ्यावर आहेत. सकाळपासूनच्या त्यांनी दौऱ्याला सुरुवात केली. उस्मानाबादमध्ये त्यांनी पाहणी केली. पाहणी दरम्यान शेतकऱ्यांनी पवारांना त्यांच्या व्यथाही सांगितल्या. पाहणीच्या वेळी कार्यकर्ते आणि शेतकऱ्यांची या ठिकाणी मोठी गर्दी पाहायला मिळाली. दरम्यान, आज सकाळी जेव्हा शरद पवार हे सकाळी ठीक 9 वाजून 15 मिनिटांनी हेलिकॉप्टरने दाखल झाले.