Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

IndiaCrimeUpdate : आंतरजातीय प्रेम पडले महागात , मुलीच्या कुटुंबियांकडून हत्या

Advertisements
Advertisements
Spread the love

आंतरजातीय प्रेम करणे दिल्लीतील आदर्श नगरमधील एका तरुणाला इतके महागात पडले कि , हि गोष्ट पसंत न पडल्याने मुलीच्या कुटुंबीयांनी त्याला इतकी बेदम मारहाण केली कि , त्याचा त्यात गंभीर जखमी झाल्याने मृत्यू झाला. या प्रकरणात पोलिसांनी ३अल्पवयीन मुलांसह ५ जणांना अटक केली आहे. पोलिसांनी सांगितले कि , मयत राहुल याचे  आरोपींच्या बहिणीवर प्रेम होते . ज्याला मुलीच्या कुटुंबीयांनी विरोध केला होता. दोघेही वेगवेगळ्या जातीचे आहेत.  ७ ऑक्टोबर रोजी दिल्लीच्या उत्तर पश्चिमी भागातील आदर्श नगरमधील मूलचंद कॉलनीत राहणारे १८ वर्षीय राहुलला काही जणांनी ट्यूशनचं कारण देत बोलावलं.  पोलिसांच्या हाती लागलेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये राहुल त्यांच्या घराकडे जात असल्याचे दिसून आले आहे. त्यानंतर काही अंतरावर त्याला मारहाण करण्यास सुरुवात केली.या मारहाणीत गंभीर जखमी झाल्यामुळे मृत्यू झाला. त्याला  जगजीवन राम रुग्णालयात  उपचारासाठी दाखल करण्यात आले होते . दरम्यान पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये दिल्यानुसार आतड्यांना दुखापत झाल्यामुळे त्याचा मृत्यू झाला असल्याचे रुग्णालयाच्या सूत्रांनी सांगितले.

Advertisements

पोलिसांनी सांगितले की, हा प्रकार दोन  कुटुंबीयांमधील आहे. यामध्ये कारवाई करण्यात आली असून याचा तपास सुरू आहे. हत्या प्रकरणात किती जणांचा सहभाग होता याची माहिती पोलिसांकडून गोळा केली जात आहे. दरम्यान हिंदू सेनाचे राष्ट्रीय अध्यक्ष विष्णू गुप्ता यांनी सांगितेल की, मी आज राहुलच्या कुटुंबीयाची भेट घेण्यासाठी आदर्श नगर येथे  जात असून  हिंदू सेना सर्व आरोपींच्या अटक आणि लवकर कारवाईसह १ कोटी रुपयांची नुकसान भरपाई देण्याची मागणी करीत आहे. राहुलच्या कुटुंबीयांनी आरोप केला आहे की त्याला ८ ते १० जणांनी मारहाण केली व त्याच त्याचा मृत्यू  झाला. राहुल बीएच्या दुसऱ्या वर्षाला शिकत होता, शिवाय तो घरात ट्यूशनही घेत होता.

Advertisements
Advertisements

आपलं सरकार

Click to listen highlighted text!