CoronaMaharashtraUpdate : गेल्या 24 तासांत राज्यात 13,395 नवीन रुग्णांची नोंद , 358 जणांचा मृत्यू

राज्यात आज 13395 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली व आज नवीन 15575 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत.एकूण 1196441 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत.राज्यात एकूण 241986 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 81.13% झाले आहे.#CoronaVirusUpdates
— Rajesh Tope (@rajeshtope11) October 8, 2020
गेल्या 24 तासांत राज्यात 13,395 नवीन रुग्णांची नोंद करण्यात आली असून 358 जणांचा मृत्यू झाला आहे. काल दिवसभरात 355 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्याचा मृत्यू दर हा 2.64 एवढा झाला आहे. बुधवारीही नव्या रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांचं प्रमाण हे जास्त होतं. आज दिवसभरात 15575 रुग्णांना रुग्णालयातून सोडण्यात आलं असून आतापर्यंत 11,96,441 कोरोना रुग्ण पूर्णपणे बरे होऊन घरी गेले आहेत. सध्या राज्याचा रिकव्हरी रेट 81.13 टक्के इतका आहे. त्यानंतर आज राज्यात 13,395 नवीन रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. सध्या राज्यात 22,84,204 जण होम क्वारंटाईनमध्ये आहेत, तर 25,321 जण विविध संस्थांमध्ये क्वारंटाईन आहेत.
दरम्यान देशातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आता 68 लाख 35 हजार 656 झाली आहे. गेल्या 24 तासांत 78 हजार 524 नवीन रुग्णांची नोंद झाली. तर, 971 रुग्णांचा मृत्यू झाला. कोरोनामुळे आतापर्यंत 1 लाख 5 हजार 526 लोकांचा मृत्यू झाला आहे. दिलासादायक बाब म्हणजे आतापर्यंत 58 लाख 27 हजार 705 लोकं आतापर्यंत रिकव्हर झाले आहेत.
Mumbai reports 2823 new #COVID19 cases, 2933 discharges and 48 deaths today. The total cases in the state rise to 2,22,761, including 1,86,675 discharges and 9293 deaths. Active cases stand at 24,789: Municipal Corporation Greater Mumbai pic.twitter.com/A5dCtEsbVH
— ANI (@ANI) October 8, 2020
मुंबईतील कोरोना अपडेट्स
आतापर्यंत मुंबईत 9296 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर त्यानंतर सर्वाधिक मृतांची संख्या पुण्यात 6134 इतकी आहे. आतापर्यंत राज्यात 39430 जणांना कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढत असले तरी मृतांचा आकडा वाढत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे राज्यातील कोरोनाची परिस्थितीत चिंता वाढवणारी आहे. गेल्या 24 तासांत मुंबईत 2823 नवीन कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली असून 2933 जणांना डिस्चार्ज मिळाला आहे. याशिवाय 48 जणांचा मृत्यू झाला आहे.
पुण्यात दिवसभरात 32 रुग्णांचा मृत्यू
पुणे शहरात आज दिवसभरात नव्याने 798 रुग्ण आढळून आले. त्यामुळे शहरातील एकूण करोनाबाधितांची संख्या 1 लाख 52 हजार 200 एवढी झाली आहे. तर दिवसभरात 32 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे आज अखेर 3 हजार 763 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. करोनावर उपचार घेणार्या 805 रुग्णांची तब्येत ठणठणीत असल्याने, त्या सर्वांना घरी सोडण्यात आले आहे. त्यामुळे आज अखेर पुणे शहरातील 1 लाख 34 हजार 405 रुग्ण करोनामुक्त झाले आहेत, अशी माहिती पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली.