AurangabadNewsUpdate : पोलिसआयुक्तांच्या विशेष पथकाच्या धाडी, जुगार अड्डे, दारु विक्री उध्वस्त

औरंगालाद – जिन्सी, सिटीचौक आणि गुन्हे शाखेच्या पोलीसांना हाताशी धरून सर्रासपणे सुरु असलेल्या जुगार अड्डयावर पोलीस आयृुक्त निखिल गुप्ता यांच्या विशेष पथकाने धडक कारवाई केली. चार जुगार अड्डयावर छापा मारून पथकाने १३ जणांना अटक केली. त्यांच्या ताब्यातून रोख रकमेसह सव्वा लाखांचा ऐवज जप्त केला. विशेष म्हणजे कारवाइत दुस-या ठाण्यातील आधिकारी व मुख्यालयातील कर्मचा-यांची मदत घेण्यात आली होती. गुन्हेगार आणि अवैध धंद्याचालकांचे माहेरघर समजल्या जाणा-या जिन्सी आणि सिटीचौक पोलीस ठाण्याचा हद्यीत अवेध धंदे जोमाने सुरु असल्याचे आज उघड झाले. गुन्हे शाखा आणि संबधीत पोलीस ठाण्याचा आधिका-यांना हाताशी धरून सर्रासपणे कल्याण मटका सुरु असल्याची माहिती पोलीस आयुक्त निखिल गुप्ता यांना मिळाली होती. खब-याने चक्क व्हिडीओ शुटींग करून जुगार अड्डयाचा पुरावाच सादर केला होता.
जिन्सी हद्यीतील दोन जुगार अड्डयावर छापा…
पोलीस आयुक्त निखिल गुप्ता यांनी पुंडलीकनगर पोलीस ठाण्याचे सहायक निरिक्षक घनश्याम सोनवणे यांना जिन्सी हद्यीत छापा मारण्याचे सांगितले. सोनवणे यांच्या पथकाने कटकट गेट येथील आफताब उर्पâ राजा यास मोबाइलवर कल्याण मटका जुगार खेळवताना अटक केली. त्याच्या ताब्यातून बारा हजार आणि दोन मोबाइल जप्त करण्यात आले तर शरीफ कॉलनीतील चिठ्ठयावर आकडे लिहुन देणा-या सहा जणांना अटक केली. त्यांच्या ताब्यातून पाच हजारांची रोख रक्कम आणि सात मोबाइल असा ऐवज जप्त केला. कल्याण मटकयाचा बुकी इरफान हा सिल्लोड येथे राहत असल्याचे समोर आले आहे.
सिटीचौक हद्यीत दोन अड्डयावर छापा…
पोलीस आयुक्तांच्या दालनातील सहायक निरीक्षक राहुल रोडे यांच्या पथकाने सिटीचौक हद्यीतील घासमंडी आणि चंपा चौकात सुरु असलेल्या कल्याण मटका अड्डयावर छापा मारून सहा जणांना अटक केली. त्यांच्या ताब्यातून सात मोबाइल, ११ हजारांची रोख रक्कम असा ६२ हजारांचा ऐवज जप्त करत ठाण्यात गुन्हा दाखल केला.