HatharasGangRapeandMurder : दिल्लीत मोठे आंदोलन , मुख्यमंत्री केजरीवाल , स्वरा भास्कर यांचाही सहभाग , राहुल – प्रियांकाचा पुन्हा योगींवर निशाणा

UP प्रशासन सच छुपाने के लिए दरिंदगी पे उतर चुका है।
ना तो हमें, ना मीडिया को पीड़िता के परिवार को मिलने दिया और ना उन्हें बाहर आने दे रहे हैं, ऊपर से परिवारजनों के साथ मार-पीट और बर्बरता।
कोई भी भारतीय ऐसे बरताव का समर्थन नहीं कर सकता। pic.twitter.com/5GMjlSBw1P
— Rahul Gandhi (@RahulGandhi) October 2, 2020
हाथरसमध्ये माध्यमांच्या प्रवेश बंदीवरून कॉंग्रेस नेते अध्यक्ष राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा उत्तरप्रदेश सरकार आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर निशाणा साधला आहे . सत्य दडपण्यासाठी युपी सरकार आता क्रौर्याने वागत आहे, असा घणाघात राहुल गांधी यांनी केला. राहुल गांधी यांनी यासंदर्भात ट्विट केलं आहे. यूपी सरकार सत्य लपवण्यासाठी आता क्रौर्यावर उतले आहे. आम्हाला किंवा माध्यमांना पीडितेच्या कुटुंबीयांना भेटू दिले जात नाहीए आणि पीडितेच्या कुटुंबीयांना घरात डांबून ठेवलं असून त्यांना बाहेर येऊ दिलं जात नाहीए. एवढचं नव्हे तर पीडितेच्या कुटुंबीयांना मारहाण करून त्यांचा छळ केला जात आहे . कुठलाही भारतीय नागरिक अशा क्रूरतेचं समर्थन करणार नाही, असं राहुल गांधी म्हणाले. दरम्यान कोरोनाला झुगारून हाथरसच्या निर्भयाला न्याय मिळवून देण्यासाठी कोरोनाची पर्वा न करता अनेक नेते , कार्यकर्ते आणि जनतेने दिल्लीच्या जंतर मंतरवर येऊन आपला आवाज बुलंद केला. यामध्ये दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनीही सहभाग नोंदवला.
.@myogiadityanath जी कुछ मोहरों को सस्पेंड करने से क्या होगा? हाथरस की पीड़िता, उसके परिवार को भीषण कष्ट किसके ऑर्डर पर दिया गया? हाथरस के डीएम, एसपी के फोन रिकार्ड्स पब्लिक किए जाएँ। मुख्यमंत्रीज अपनी जिम्मेदारी से हटने की कोशिश न करें। देश देख रहा है @myogiadityanath इस्तीफा दो
— Priyanka Gandhi Vadra (@priyankagandhi) October 2, 2020
दरम्यान सायंकाळी उत्तर प्रदेश सरकारने पोलिसांनी हाथरस प्रकरण नीट न हाताळल्याचा ठपका ठेवत चार वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसह काही कर्मचाऱ्यांना निलंबित केल्याचे आदेश जरी केले असून पीडितेच्या कुटुंबियांना धमकावल्याचा आरोप असणाऱ्या जिल्हाधिकाऱ्यावरही कारवाई करण्यात येईल असे संकेत आहेत. या कारवाईवर टीका करताना प्रियांका गांधी यांनीही ” प्याद्यांवरील कारवाई ” असल्याची टीका केली आहे. जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस अधीक्षक यांचे फोन कॉल्स सार्वजनिक करा आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ जबादारीपासून हटू नका राजीनामा द्याअसे म्हटले आहे.
ग़रीब-दलित-आदिवासी की आवाज़ दबाओगे,
सच कब तक छुपाओगे,
और कितनी बेटियाँ चुपके-से जलाओगे?अब देश की आवाज़ रोक ना पाओगे!#JusticeForIndiasDaughters #HathrasHorror
— Rahul Gandhi (@RahulGandhi) October 1, 2020
हाथरस गावात माध्यमांच्या प्रवेशास बंदी घातली गेली आहे. कोणत्याही नेत्याला जाऊ दिलं जात नाही. जिल्हाधिकारी धमक्या देत असल्याचा आरोप पीडित कुटुंबाने केला आहे. जिल्हाधिकारी धमकी देत असल्याचा व्हिडिओ गुरुवारी सोशल मीडियावर व्हायरल झाला. काँग्रेस नेते आणि पक्षाच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी हा व्हिडिओ ट्विट करून शेअर केला. राहुल गांधी, प्रियंका गांधी यांना गुरुवारी हाथरसला जाण्यापासून युपी प्रशासनाने रोखलं होतं. आता शुक्रवारी टीएमसीचे खासदार डेरेक ओ ब्रायन यांना रोखण्यात आलं. यावेळी त्यांना धक्काबुक्की केल्याचाही आरोप होतोय. इतकचं नव्हे तर आता पीडित मुलीच्या गावात माध्यमांना प्रवेश बंदी करण्यात आली आहे.
लखनऊमध्ये या मुद्द्यावरून आंदोलन करणार्या समाजवादी पक्षाच्या नेत्यांवर पोलिसांनी लाठीमार केला. यात पक्षाचे अनेक कार्यकर्ते जखमी झाले. सपाचे प्रवक्ते अनुराग भदौरिया यांनाही दुखापत झाली. हाथरस प्रकरणानंतर अवघा देश ढवळून निघाला आहे. पीडितेच्या मृत्यूनंतर तिचा मृतदेह कुटुंबीयांशिवाय जाळल्यामुळे उत्तर प्रदेश प्रशासनाचा क्रूर चेहराच समोर आला असल्याचा आरोप होत आहे. शिवाय हाथरस प्रकरणातील मुलीवर बलात्कार झाल्याचं नसल्याचा दावा उत्तर प्रदेशचे अतिरिक्त पोलिस महासंचालकांनी (कायदा व सुव्यवस्था) केला आहे . यानंतर दिल्लीत राजधानी दिल्लीत पुन्हा एकदा जनता हाथरसच्या ‘निर्भया’ला न्याय मिळवून देण्यासाठी रस्त्यावर उतरली आहे.
दरम्यान भीम आर्मी पक्षाचे प्रमुख चंद्रशेखर आझाद यांनी हाथरस सामूहिक बलात्कार प्रकरणात इंडिया गेटवर प्रदर्शनासाठी जनतेला आवाहन केलं होतं. परंतु,, दिल्ली पोलिसांनी गुरुवारी इथं गर्दीला प्रतिबंध करण्यासाठी निर्देश जारी केले होते. त्यानंतर चंद्रशेखर यांनी ३ किलोमीटर दूर जंतर मंतरवर हे आंदोलन हलवलं. त्यामुळे भीम आर्मीच्या शेकडो कार्यकर्त्यांसहीत दिल्लीची जनताही या आंदोलनात सहभागी झाली होती. ‘मी हाथरसला भेट देणार आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी राजीनामा देईपर्यंत आणि न्याय मिळेपर्यंत आमचं हे आंदोलन सुरूच राहील’ असं म्हणतानाच या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयानं हस्तक्षेप करावा, अशी मागणी चंद्रशेखर आझाद यांनी केली आहे. या अगोदर हाथरस पीडित कुटुंबाला भेट देण्याच्या तयारीत असलेल्या चंद्रशेखर आझाद यांना त्यांच्याच घरात प्रशासनानं नजरकैद केलं होतं.
शुक्रवारी सायंकाळी शेकडो लोक या घटनेच्या निर्षधार्थ करोनाचा धोका पत्करून एकत्र जमलेले होते. हाथरस गँगरेप प्रकरणात जंतर मंतरवर सुरू झालेल्या निदर्शनात इतर विरोधी पक्षाचे नेतेही सहभागी झाले होते. सीपीएम नेते सीताराम येचुरी आणि सीपीआय नेते डी राजा यांनीही या आंदोलनात सभाग नोंदवला. तसेच सिनेअभिनेत्री स्वरा भास्कर , दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनीही हाथरसच्या निर्भयाला न्याय मिळावा म्हणून आपला पाठिंबा जाहीर केला . दरम्यान काल , गुरुवारी हाथरस पीडित कुटुंबीयांची भेट घेण्यासाठी निघालेल्या राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांना रस्त्यातच रोखण्यात आल्यानंतर काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी वाड्रा आज दिल्लीच्या वाल्मिकी मंदिरात पोहचल्या. शुक्रवारी मंदिर मार्ग स्थित वाल्मिकी मंदिरात दाखल होत प्रियांका गांधी हाथरसच्या निर्भयाच्या प्रार्थनासभेत सहभागी झाल्या होत्या.