SadNewsUpdate : खेळता खेळता बंद कार मध्ये अडकलेल्या दोन मुलांचा गुदमरून मृत्यू

भंगाराच्या गोडाऊन शेजारी उभ्या असलेल्या बंद होडा सिटी कारमध्ये गुदमरून दोन चिमुरड्या सख्ख्या भावांचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. नागंलवाडी फाट्यावर भंगार वाल्याने भंगारात विकत घेतलेल्या कारचे दरवाजे अॅटोलॉक झाल्यामुळे ही घटना घडली आहे. सुहेल खान वय वर्ष ६ आणि अब्बास खान वय वर्ष ४ अशी मृत मुलांची नावं आहेत. हे दोघे चिमुरडे संध्याकाळी खेळताना या गाडीत बसले असावे, असा अंदाज बांधण्यात येत आहे. दरम्यान गाडीचा दरवाजा बंद झाला आणि लहानग्यांना तो उघडता आला नाही. त्यामुळे गुदमरून दोघांनी आपला जीव गमावला, असा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे. दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी महाड ग्रामीण रुग्णालयामध्ये नेण्यात आले असून महाड औद्योगिक वसाहत पोलीस याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत.