ट्रक- कार अपघातात नांदेड जिल्ह्यातील ४ ठार, ४ जखमी

Advertisements
Advertisements
Spread the love

अहमदनगर-जामखेड रोडवर झालेल्या भीषण अपघातात चौघांचा मृत्यू झाला आहे. तर चार जण यात जखमी आहेत. जखमींवर जवळील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. रविवारी सकाळी 6 वाजताच्या सुमारास हा अपघात झाला आहे.

Advertisements

जामखेडपासून 10 किलोमीटर अंतरावर असलेल्या पोखरी फाटा येथे ट्रक आणि इर्टीगा गाडीची समोरासमोर धडक होऊन हा भीषण अपघात झाला आहे. भीषण अपघातात चार जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये 2 पुरुष, एक महिला आणि एका लहान मुलांचा समावेश आहे. नागेश चमकुरे,  योगेश चमकुरे, अनुजा चमकुरे, अनिकेत चमकुरे (7 वर्षे) अशी मृतांची नावे आहेत.

Advertisements
Advertisements

सर्वजण एकाच कुटुंबातील असून नांदेड जिल्ह्यातील रहिवाशी आहेत. नांदेड मधून गुजरातला जात असताना हा अपघात झाला. दरम्यान अपघातानंतर ट्रकचालक फरार झाला असून जखमींवर जामखेड येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. पोलीस अधिक तपास करत आहेत.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!