Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

मातोश्रीवरील बैठक राजकीय नव्हे, औरंगाबाद दौ-यासंदर्भात होती : पंकजा मुंडे

Advertisements
Advertisements
Spread the love

उद्धव ठाकरे आणि आमचे संबंध हे पक्षाच्या पलिकडचे आहेत. आज मी त्यांना भेटण्यासाठी आणि त्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी मातोश्रीवर आले होते, असे स्पष्टीकरण महिला आणि बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी दिले. पंकजा मुंडे आणि राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी आज मातोश्रीवर येऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. या बैठकीबाबत राजकीय चर्चांना उधाण आले आहे. या भेटीसंबंधी पंकजा यांनी माध्यमांना माहिती दिली.

Advertisements

पंकजा म्हणाल्या की, आम्ही कोणतीही राजकीय चर्चा केलेली नाही. मी भाजपची मराठवाड्याची समन्वयक आहे. मराठवाड्यात उद्या मुख्यमंत्री आणि उद्धव यांची सभा आहे. या सभेच्या नियोजनाबाबत चर्चेसाठी मी मातोश्रीवर आले होते. तसेच उद्धव ठाकरे आणि आमचे संबंध हे पक्ष आणि राजकारणाच्या पलिकडचे आहेत. आपण सध्या लोकसभेला सामोरे जात आहोत. त्यामुळे मी उद्धव ठाकरेंचे आशीर्वाद घेण्यासाठी मातोश्रीवर आले होते.

Advertisements
Advertisements

आपलं सरकार

Click to listen highlighted text!