CoronaWorldUpdate : क्वारंटाईन सेंटरमधील १८ हजार लोक झाले कोरोना संक्रमित, ७६८ जणांचा मृत्यू , ऑस्ट्रेलियात हाहाकार….

ऑस्ट्रेलियातील एका हॉटेलमधील क्वारंटाईन सेंटरमधील १८ हजार लोक कोरोना संक्रमित झाले असून ७६८ लोकांचा जीव गेला असल्याचे धक्कादायक वृत्त आहे. “आज तक”ने डेली मेलचा हवाला देत हे वृत्त दिलं आहे. क्वारंटाईन प्रोग्राममधील त्रुटींमुळे १८ हजार लोक संक्रमित झाल्याचे सांगितले जात आहे.कोरोनाव्हायरसचा प्रसार अधिक होऊ नये म्हणून इतर ठिकाणांहून आलेल्या लोकांना सर्वात आधी क्वारंटाईन केलं जातं. जेणेकरून त्यांना कोरोना असल्यास आणि काही दिवसांनी त्यांच्यामध्ये लक्षणं दिसू लागल्यास त्यांच्यावर उपचार होतील आणि त्यांच्यामार्फत कोरोना जास्त पसरणार नाही. मात्र ऑस्ट्रेलियामध्ये हाच क्वारंटाईन प्रोग्राम जीवघेणा ठरल्याचा आरोप केला जातो आहे.
दरम्यान या प्रकरणी आरोग्यमंत्री जेन्नी मिकाकोसयांना क्वारंटाईन प्रोग्रामसाठी जबाबदारधरल्यानंतर शनिवारी त्यांनी राजीनामा दिला. आता व्हिक्टोरियाचे प्रीमिअर डेनिअल माइकेल एन्ड्रूज यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरू लागली आहे. विरोधी नेते मायकेल ओ ब्रायन यांनी ही मागणी केली आहे. व्हिक्टोरियातील सार्वजनिक प्रशासनाच्या इतिहासातील ही सर्वात मोठी चूक असल्याचं ते म्हणाले. हॉटेल क्वारंटाईन प्रोग्राममुळेच मे महिन्यात कोरोनाची प्रकरणं मोठ्या प्रमाणात पसरू लागली. 90 टक्के प्रकरणं या प्रोग्रामशी संबंधित असल्याचं सांगितलं जातं आहे.
रिपोर्टनुसार, हॉटेलमध्ये क्वारंटाईन प्रोग्राम सुरू करण्यात आला मात्र तो फारसा यशस्वी झाला नाही. त्याचे उलट परिमाण झाले आणि याला कारण म्हणजे क्वारंटाईन प्रोग्राममधील त्रुटी आहेत. प्रोटेक्टिव्ह गिअरचा योग्य वापर झाला नाही. स्टाफला नीट प्रशिक्षण दिलं नाही, सोशल डिस्टन्सिंगचंही पालन करण्यात आलं नाही, असा आरोप होतो आहे. इतकंच नव्हे तर हॉटेल क्वारंटाईन प्रोग्राममुळे मेलबर्नमध्ये कोरोनाची दुसरी लाट पसरली असा दावाही केला जातो आहे. दरम्यान सरकारने क्वारंटाईन प्राणाली तयार करण्यात घाई केली आणि त्यावर लक्ष ठेवण्यातही सरकार अपयशी ठरलं आहे, असं या प्रकरणी वकिलांनी तपास समितीला सांगितलं. त्यामुळे