PuneNewsUpdate : पुन्हा एकदा जम्बो कोविड सेंटर पुणे : सहकारी डॉक्टरनेच केला डॉक्टर महिलेचा विनयभंग

Advertisements
Advertisements
Spread the love

पुण्यातील शिवाजी नगर येथी जम्बो कोविड केअर सेंटर कायम कुठल्या ना कुठल्या कारणांमुळे चर्चेत आहे. दरम्यान याच सेंटरमध्ये काम करणाऱ्या एका महिला डॉक्टरचा सरकारी डॉक्टरनेच विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.  त्यामुळे कोविड केअर सेंटरमधील महिलांच्या सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. राज्यात कोरोनाचा कहर सुरूच असून त्यावरमात करण्यासाठी मुंबई, पुणे, ठाणे आणि नागपूरसह राज्यात ठिकठिकाणी कोविड सेंटर उभारले आहेत. या ठिकाणी डॉक्टर, आरोग्य कर्मचारी दिवसरात्र रुग्णांची सेवा करत आहेत. अशाच काही सेंटरमध्ये उपचार घेणाऱ्या महिला आणि तरुणींचे विनयभंग किंवा त्यांच्यावर लैंगिक अत्याचार झाल्याच्या घटना उघडकीस आल्या होत्या. राज्यातील अनेक नेत्यांनी हा मुद्दाही उपस्थित केला होता. त्यात आता पुण्यातील शिवाजी नगर येथील कोविड केअर सेंटरमध्ये काम करणाऱ्या एका महिला डॉक्टरचा विनयभंग केल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. सर्वात गंभीर बाब म्हणजे तेथे काम करणाऱ्या सहकारी डॉक्टारांनी हे कृत्य केले आहे. या प्रकरणी २५ वर्षीय महिला डॉक्टरने शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Advertisements

आपलं सरकार

Click to listen highlighted text!