Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

वृत्तपत्र विद्या व जनसंवाद विषयाचे प्रा . देवानंद गडलिंग यांचे निधन

Advertisements
Advertisements
Spread the love

भारतीय जन संचार संस्थेच्या अमरावती प्रादेशिक केंद्रात कार्यरत असलेले प्रा. डॉ. देवानंद गडलिंग यांचे हृदयविकाराच्या झटक्याने बुधवारी रात्री निधन झाले. ते 42 वर्षांचे होते. गेल्या नोव्हेंबरलाच संस्थेत रुजू झालेले प्रा. गडलिंग एक मनमिळावू शिक्षक म्हणून विद्यार्थ्यामध्ये अल्पावधित प्रिय झाले होते. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, आई-वडिल, भाऊ व तीन बहिणींसह बराच मोठा आप्त परिवार आहे.  डॉ. गडलिंग यांच्या रुपाने संस्थेने एक होतकरू शिक्षक गमाविला असून भारतीय जन संचार संस्था गडलिंग परिवाराच्या दू:खात सहभागी आहेत, अशा शब्दात प्रादेशिक संचालक विजय सातोकर यानी आपल्या संवेदना व्यक्त केल्या आहेत.

Advertisements

प्रा. डॉ . देवानंद गडलिंग यांनी काही काळ डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वृत्तपत्र विद्या आणि जनसंवाद विभागातही प्राध्यापक म्हणून आपले योगदान दिले होते. जनसंवाद आणि पत्रकारिता विषयात तीन वेळा नेट आणि एक वेळा सेट हि परीक्षा देऊन प्रा . गडलिंग यांनी आपली गुणवत्ता सिद्ध केली होती.

Advertisements
Advertisements

आपलं सरकार

Click to listen highlighted text!