IndiaNewsUpdate : मोठी बातमी : केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांचं कोरोनामुळे निधन

देशात कोरोनाचा कहर चालूच असून केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांचे कोरोनामुळे निधन झाले आहे. पहिल्यांदाच भारताचे केंद्रीय मंत्री कोरोनाला बळी पडले आहेत. अंगडी यांच्यावर गेल्या दोन आठवड्यांपासून उपचार सुरू होते. बेळगावचे खासदार असलेले सुरेश अंगडी पहिल्यांदाच मोदींच्या मंत्रिमंडळात मंत्रिपद भूषवत होते.११ सप्टेंबरला सुरेश अंगडी यांनी ट्विट करून आपल्याला कोरोनाचा संसर्ग झाल्याची माहिती दिली होती. त्यांची कोरोना टेस्ट चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांना दिल्लीच्या AIIMS रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. तिथेच त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
११ सप्टेंबरला ट्विट करून आपल्याला कोरोनाचा संसर्ग झाल्याचं त्यांनी कळवलं होतं. डॉक्टरांचा सल्ला घेत असल्याचं सांगत त्यांनी संपर्कात आलेल्या सर्वांनी चाचणी करून घ्या, असं आवाहनही केलं होतं. सुरेश अंगडी २००४ पासून बेळगावमधून भाजपच्या तिकिटावर खासदार म्हणून निवडून येत आहेत. त्यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर अंगडी यांना दिल्लीच्या AIIMS रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. तिथेच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांची प्रकृती गंभीर होती. उपचारांना प्रतिसाद मिळत नव्हता. ते ६५ वर्षांचे होते. सुरेश अंगडी यांच्या मागे पत्नी आणि दोन मुली आहेत.