AurangabadNewsUpdate : कैद्यांची कोरोना टेस्ट पोलिसांनी करावी की तुरुंग प्रशासनाने ?

औरंगाबाद – आरोपींना कोर्टात हजर केल्यानंतर न्यायालयीन कोठडी मिळाल्यास त्यांची कोव्हिड टेस्ट पोलिसांनी करुन तुरुंग प्रशासनाच्या हवाली करावे की,तुरुंग प्रशासनाने कोव्हिड टेस्ट करुन घ्यावी याबाबत अप्पर पोलिस महासंचालक सुनिल रामानंद यांनी कानावर हात ठेवले.
औरंगाबादेत पोलिस अधिकारी आणि तुरुंग प्रशासन अधिकार्यांमधे न्यायालयीन कोठडी मिळालेल्या कैद्यांची टेस्ट कोणी करावी यावर लहान सहान वाद होतात.तुरुंग प्रशासनाचे म्हणणे आहे की, पोलिस कैद्यांचे वैद्यकीय तपासणी करतात तेंव्हाच कैद्यांची कोव्हिड चाचणी करुन तुरुंग प्रशासनाकडे सूपूर्द करावे यावर औरंगाबाद पोलिसांनी आक्षैप घेत नागपूर च्या तळोजा कारागृहासंदर्भात प्रथमवर्गन्यायदंडाधिकार्यांनी एप्रिल २०२०मधे दिलेला आदेश पुढे करतात. त्या आदेशात म्हटले आहे की, तुरुंग प्रशासनाने त्यांच्या ताब्यात असलेल्या कैद्यांची कोव्हिड टेस्ट करुन घ्यायला हरकंत नाही. या वादावर तुरुंग प्रशासन विभागाचे पोलिस महासंचालक यांच्याशी संपर्क साधला असता , ” बघतो काय आहे ते…” असे म्हणून फोन कट केला.