गोव्यात काँग्रेसचा सत्तास्थापनेसाठी राज्यपालांकडे दावा

काँग्रेसने गोव्यात राज्यपालांना पत्र पाठवून सत्तास्थापनेचा दावा केला आहे. मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांची प्रकृती ढासळली आहे ते सत्ता चालवू शकत नाहीत त्यामुळे हे सरकार बरखास्त करून आम्हाला सत्तास्थापनेची संधी द्यावी असं काँग्रेसने आपल्या पत्रात म्हटलं आहे. गोव्याचे विरोधी पक्षनेते चंद्रकांत कावलेकर यांनी ही मागणी केली आहे.
गोव्यात भाजपा सरकार सत्ता चालवण्यात अपयशी ठरलं आहे. त्यामुळे आम्ही राज्यात सर्वात मोठा पक्ष आहोत ही बाब लक्षात घेऊन आम्हाला सत्ता स्थापनेची संधी द्यावी अशा संदर्भातले एक पत्र काँग्रेसने राज्यपालांकडे सोपवलं आहे. आम्ही गोव्यात सर्वात मोठा पक्ष ठरलो आहोत आणि हा गोव्यातल्या जनतेचा कौल आहे ज्यावर आपण विचार कराल अशीही विनंती काँग्रेसने केली आहे.
दरम्यान गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांची प्रकृती खालावली असल्याने त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. मागील वर्षांपासूनच त्यांची प्रकृती वारंवार बिघडली आहे. अशा परिस्थितीत त्यांनी राज्याचं बजेटही सादर केलं होतं. मात्र आता काँग्रेसने सत्तास्थापनेचा दावा करत तसं पत्रच राज्यपालांकडे सोपवलं आहे आणि जनमताचा विचार करावा अशीही मागणी केली आहे. गोव्याचे विरोधी पक्षनेते चंद्रकांत कावलेकर यांनीही मागणी केली आहे.