AurangabadCrimeNewsUpdate : रेकाॅर्डवरच्या गुन्हेगाराचा खून, चौघांना अटक

औरंगाबाद- एक महिन्यांपूर्वी शिक्षा भोगून आलेल्या गुन्हेगाराचा त्याच्या साथीदारांनी पडेगाव परिसरात खून केला.या प्रकरणी गुन्हेशाखेने तिघांना तर छावणी पोलिसांनी एकाला अटक केली आहे.
भोईवाड्यातील अजहर मोहम्मद हमीद असे या रेकाॅर्डवरील मयताचे नाव आहे.त्याच्यावर घरफोडी आणि जबरी चोरीचे गुन्हे दाखल आहेत. याच्या खून प्रकरणात गुन्हेशाखेने शेख रिजवान शेख, सलीम करीम पटेल आणि लखन जारवाल अशा तिघांना अटक केली तर रोहन येरले याला छावणी पोलिसांनी अटक केली. यातील पाचवा आरोपी गोरख ब्रम्हपुरे फरार आहे.
पूर्व वैमनस्यातून खून केल्याची कबुली लखन जारवाल ने गुन्हेशाखेला दिली.या प्रकरणातील अटक आरोपी सलीम पटेल याच्यावर मारामारी व गंभीर इजा पोहोचवण्याचे गुन्हे दाखल आहेत. तर शेख रिजवान आणि लखन जारवाल यांच्यावर अद्याप कोणताही गुन्हा नव्हता. तर रोहन येरले हा रेल्वे मधे पाकीटमारी करतो. या प्रकारचे अनेक गुन्हे येरलेवर आहेत. अशी माहिती गुन्हेशाखेच्या वरिष्ठ सुत्रांनी दिली. वरील कारवाईत गुन्हेशाखा पोलिस निरीक्षक अनिल गायकवाड, एपीआय अजबसिंग जारवाल, छावणी पोलिस निरीक्षक मनोज पगारे एपीआय हिवराळे यांनी सहभाग घेतला होता.