IndiaNewsUpdate : बिहारच्या विकासकामांच्या निमित्ताने मोदींनी साधला छट पूजा , नमामि गंगे आणि डॉ. बाबासाहेबांचा समन्वय !!

Urbanisation is the reality of present times. For many decades, it was considered that urbanisation was a problem in itself. But I don't think that way. If it is a problem, there are opportunities also. BR Ambedkar was a big supporter of urbanisation: PM Narendra Modi https://t.co/SyfuLvFkFF pic.twitter.com/Sa5eF5a2QS
— ANI (@ANI) September 15, 2020
सध्या भाजपचे नेते , कार्यकर्ते , मंत्री , आमदार खासदार स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे लक्ष बिहार आणि पश्चिम बंगालच्या आगामी निवडणुकांवर आहे . सध्या कोरोना काळात लाखो लोक , बेरोजगार झाले आहेत, उद्योग , व्यापार मोडीत निघाला आहे . शेती आणि शेतकरी उद्धवस्त झाला आहे . अर्थव्यवस्था मोडकळीस आली आहे आणि भाजप नेते आपला राजकीय हेतू सध्या करण्यासाठी तन -मन -धनाने प्रयत्न करीत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या निवडणुका जिंकण्याच्या उद्धेशाने या दोन राज्यात विविध योजनांचे उदघाटन करण्याचा धूम धडाका लावला आहे. याच उपक्रमाचा एक भाग म्हणून मोदी यांनी बिहार मधील विविध नागरी सुविधांच्या सात प्रकल्पांचं उद्घाटन व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे केलं. यापैकी चार प्रकल्प पाणीपुरवठ्यासंबंधी आहेत. तर दोन प्रकल्प सांडपाण्याचे असून, एक नदी सुधारणेशी संबंधित आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी छठ पूजा आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा उल्लेख करत राजकीय समीकरण सांधण्याचा प्रयत्न केला. राज्यातील १६ टक्के दलित मातांवर नजर क्ष्य ठेवून ते म्हणाले कि , भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना शहरीकरणाचे महत्त्व लक्षात आले होते. ते शहरीकरणाचे मोठे समर्थक होते. गरीबांना सर्व सुविधा आणि संधी उपलब्ध होतील अशा शहरांची कल्पना त्यांनी त्यावेळी मांडली होती. म्हणजेच पुढे जाण्यासाठी अशा शहरांमधून तरुणांना अनेक संधी मिळतील. बिहारचे नागरीकही भारताच्या शहरीकरणात आपले योगदान देत आहेत. हि सर्व मते लालूप्रसाद यादव यांची वोट बँक आहे. परंतु पंतप्रधान मोदींनी लालू प्रसाद यादव याचं नाव घेता त्यांच्यावर टीका केली. स्वार्थी नीती आणि मतांच्या राजकारणामुळे प्रशासनावर दबाव येतो आणि यामुळे समाजातील वंचित आणि शोषितांना त्याचे परिणाम भोगावे लागतात, असेही मोदी म्हणाले.
एकीकडे दलित मतदारांना लक्ष्य करताना दुसरीकडे ‘नमामि गंगे’चा या योजनेच्या निमित्ताने धार्मिक मतांनाही आकर्षित करण्याचा प्रयत्न मोदींनी आपल्या भाषणात केला. या विषयी बोलताना ते म्हणाले कि, बिहारच्या जनतेचं गंगा नदीशी अतिशय जवळचं नातं आहे. गंगा नदी स्वच्छतेचा सकारात्मक परिणाम अनेक नागरिकांच्या जीवनावर दिसून येत आहे. गंगा नदी स्वच्छतेच्या दृष्टीने ६ हजार कोटी रुपयांच्या ५० हून अधिक योजनांना मंजुरी देण्यात आली आहे. गंगा किनाऱ्या वसलेल्या सर्व शहरांचे सांडपाणी गंगेत मिसळण्यापासून रोखण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. यासाठी जलशुद्धीकरण आणि रिव्हरफ्रंट डेव्हलपमेंट योजना सुरू केल्या जात आहेत. छठ पूजेचा सण लवकरच येत आहे. अशावेळी गंगेच्या स्वच्छ पाण्यात नागरिक स्नान करू शकतील, असं पंतप्रधान मोदी म्हणाले. बिहार विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यासाठी ५४१ कोटी रुपयांचा निधी जाहीर करण्यात आला आहे. त्या अंतर्गत विविध नागरी सुविधांच्या सात प्रकल्पांचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे केले. सात प्रकल्पांमध्ये सिवान नगरपरिषद आणि छपरा महापालिकेद्वारे ‘अमृत मिशन’अंतर्गत बांधल्या जाणाऱ्या पाणीपुरवठा प्रकल्पामुळे स्थानिकांना चोवीस तास शुद्ध पिण्याचे पाणी मिळण्यास मदत होणार आहे. तसंच, ‘नमामि गंगे’अंतर्गत मुझफ्फरपूर रिव्हरफ्रंट डेव्हलपमेंट योजनेचं उद्घाटनही पंतप्रधानांच्या हस्ते झालं. ‘अमृत मिशन’ अंतर्गत मोदींनी मुंगर पाणीपुरवठा योजनेचंही उद्घाटन केलं. बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार हेदेखील या कार्यक्रमाला उपस्थित होते.