CoronaEffectUpdate : कोरोना झाला असेल किंवा नसेल या गाईड लाईन्स पाळा आणि कोरोनाला दूर ठेवा

Union Health Ministry issues 'post COVID-19 management protocol'; use of Chyawanprash, Yogasana, Pranayama and walks among suggestions. pic.twitter.com/aNLzi6P3hw
— ANI (@ANI) September 13, 2020
सध्या देशात कोरोनाच्या संसर्गामुळे लोक त्रस्त असून आहारात काय घ्यावे आणि काय नाही या विषयी लोकांमध्ये मोठा संभ्रम आहे. हे लक्षात घेऊन करोनामुक्त झालेल्या नागरिकांसाठी पोस्ट कोविड -१९ व्यवस्थापनाचे नियम केंद्रीय आरोग्य विभागाने जाहीर केले आहेत. लोकांच्या तक्रारीनुसार कोरोनामुक्त झाल्यानंतरही अनेकांना अशक्तपणा, अंगदुखी, खोकला आणि श्वास घेण्यास त्रास होणं यासारखी लक्षणे दिसून येत आहेत. अशा प्रकाराची संख्या मर्यादित असली तरीही आवश्यक ती पावलं उचलता यावी यासाठी संशोधन सुरू करण्यात आलं आहे.
केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या नवीन प्रोटोकॉलमध्ये या करोनामुक्त झालेल्या नागरिकांना च्यवनप्राश खाणं, हळद दूध पिणं, योग आणि फिरण्याचा सल्ला देण्यात आला आहे. याव्यतिरिक्त, नागरिकांनी मास्क वापरण्याबरोबरच सोशल डिस्टन्सिंगचे पालन करण्यास सांगितलं गेलं आहे. पुरेशा प्रमाणात गरम पाणी पिण्याचा सल्लाही मंत्रालयाने दिला आहे. याव्यतिरिक्त, आयुष मंत्रालयाने देखील रोग प्रतिकारशक्ती वाढविणारी औषधे घेण्यास सांगितलं आहे.
दरम्यान लोकांमध्ये जागरुकता वाढवण्यासाठी कोरोनामधून बरे झालेले रुग्ण आपला अनुभव मित्र, नातेवाईकांसह सांगू शकतात. यासाठी तुम्ही सोशल मीडियासह इतर माध्यमांचा उपयोग करू शकता. याशिवाय महत्वाचे म्हणजे करोनामुक्त झाल्यावर हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाल्यावर नागरिक ७ दिवसांनी फोनवरून किंवा इतर मार्गांनी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. एखादी व्यक्ती जर घरातच आयसोलेशनमध्ये असेल आणि प्रकृती अधिकच बिघडत असेल तर त्वरित जवळच्या रुग्णालयात त्वरित संपर्क साधण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.
रोग प्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी आपण हे करू शकता
रोज आयुष काढा (१५० मिली, एक कप)
– समशामनी वटी, दिवसातून दोनदा (५०० ग्रॅम)
-गिलोए पावडर, १५ दिवसांसाठी १ गरम पाण्यातून १-३ ग्रॅम
– अश्वगंधा, दिवसातून दोन वेळा (५०० ग्रॅम)
– अश्वगंधा पावडर, १५ दिवसांसाठी गरम पाण्यातून दिवसातून दोन वेळा १-३ ग्रॅम
– आवळा किंवा आवळा पावडर (दररोज १ ते ३ ग्रॅम)
– कोरडा खोकला झाल्यावर मुलेठी पावडर ( कोमट पाण्यात १-२ ग्रॅम ) दिवसातून दोन वेळा
– सकाळी आणि संध्याकाळी गरम दूध, अर्धा चमचा हळद घालून प्या. कोरड्या खोकल्यासाठी
– हळद आणि मीठ पाण्याने गुळण्या करा
– दररोज एक चमचा च्यवनप्राश खा
हा सल्ला लक्षात घेण्याची गरज
– मास्क घाला , हँड सॅनिटायजरचा वापर करा आणि सोशल डिस्टन्सिंगचे पालन करा.
– दररोज पुरेशा प्रमाणात गरम पाणी प्या , रोग प्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी आयुर्वेदिक औषधं प्या ,
– शक्यतो घरातून काम करणे सुरू ठेवा, बाहेरील व्यावसायिक कामांना हळूहळू सुरू करा
– योग, प्राणायाम ध्यानासारखे नियमित व्यायाम करा, – डॉक्टरांनी दिलेल्या सल्ल्यानुसार श्वासोच्छ्वास करण्याचा व्यायाम करा
– सकाळ आणि संध्याकाळ चालत राहा, – ताजे शिजलेले अन्न खा, अधिक पौष्टिक आहार घ्या, पुरेशी झोप आणि विश्रांती घ्या.
– मद्यपान करू नका आणि मद्यपान करू नका. , शरीराचं तपमान मोजणे, रक्तदाब तपासणे आदि.
– जर घसा कोरडा असेल तर गरम पाण्याची वाफ घ्यावी किंवा गरम पाण्याच्या गुळण्या करा